Monday, June 24, 2024

राधे श्याम चित्रपटातील ‘आशिकी आ गयी’ गाणे प्रदर्शित, दिसली प्रभास आणि पूजाची अप्रतिम केमेस्ट्री

बाहुबली फेम अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘राधे श्याम’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या सिनेमातील पहिले गाणे ‘आशिकी आ गई…’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. मागील अनेक काळापासून या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. सिनेमाचा टिझर पाहून ही उत्सुकता अधिक शिगेला पोहचली आहे. या गाण्याचा टिझर काही दिवसांपूर्वी आला होता त्यानंतर आता हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

अरिजित सिंगच्या आवाजातील हे रोमंटिक गाणे प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच लोकांच्या पसंतीस उतरले आहे. गाण्यात प्रभास आणि पूजाची केमेस्ट्री पाहण्याजोगी असून, त्यांचे रोमँटिक सीन देखील अतिशय सुंदर आणि लक्षवेधी दिसत आहेत. गाण्यात जुना काळ दाखवला असलयाने त्या काळानुसार पार्श्वभूमीला सर्व वातावरण तयार करण्यात आले असून, प्रभास आणि पूजा यांची वेशभूषा देखील अतिशय सुंदर आहे.

गाण्याची सुरूवात पूजा आणि प्रभासच्या संवादावरून सुरू होते, ज्यात पूजा म्हणते, “तू स्वतःला रोमियो समजतो का?” यावर प्रभास म्हणतो, “त्याने प्रेमात जीव दिला होता, मी त्या टाईपचा नाहीये.” यानंतर लगेचच गाण्याला सुरूवात होते. भर पाऊसात त्यांचा रोमान्स पाहून सर्वच लोकं गाण्याच्या प्रेमात पडतील. या गाण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गाण्यात असलेले बॅकग्राऊंड. या गाण्यात अतिशय सुंदर आणि आकर्षक लोकेशन दाखवण्यात आले आहे. या गाण्याचे शब्द मिथुन यांनी लिहिले असून संगीत बलहारा यांनी हिंदी गाण्यांना म्युझिक दिले आहेत.

गाणे प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी गाण्याला पसंतीची पावती देत गाणे आवडल्याच्या कमेंट्स देखील दिल्या आहेत. काही तासातच हे लाखो लोकांनी पाहिले आहेत. यासोबतच लोकांना अरिजित सिंगचा आवाज देखील खूप आवडत आहे. हा सिनेमा येत्या १४ जानेवारी २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा