विकी आणि कॅटरिनाने पाठवले कंगना रनौतला लग्नाचे खास गिफ्ट, फोटो शेअर करत म्हटले धन्यवाद


बॉलिवूडमध्ये काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाविषयी खूपच चर्चा होत होत्या. आता हे दोघं विवाहबंधनात अडकले असून, त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता त्यांचे लग्न झाले असले तरी त्या दोघांबद्दल रोज नवनवीन चर्चा सोशल मीडियावर येत आहेत. त्यांच्याविषयी येणाऱ्या चर्चा जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील अतिशय उत्सुक असतात.

लग्नानंतर या नवीन जोडप्याने लग्नामध्ये उपस्थित नसलेल्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट पाठवले आहे. या गिफ्टचे फोटो समोर आले असून, ते भरपूर व्हायरल होत आहेत. विकी आणि कॅटरिनाचे गिफ्ट बॉलीवूडमधील क्वीन कंगना रनौत (kangna ranaut) कडे देखील पोहोचले आहे. या भेट्वस्तूचा एक फोटो कंगनाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

kangana ranaut
Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

कंगनाने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीमध्ये विकी आणि कॅटरिना यांच्याकडून मिळालेल्या गिफ्टचा फोटो शेअर केला आहे. या गिफ्टमध्ये खूप सारी फुले आणि त्या सोबतच कंगनाने एक नोटही लिहिली आहे. कॅटरिना आणि विकी यांनी गिफ्टमधे शुद्ध गावरान तुपातील लाडू पाठवले आहेत. कंगनाने तिच्या नोटमध्ये लिहिले आहे की, “कॅटरिना आणि विकी यांच्याकडून स्वादिष्ट असे गावरान तुपातील लाडू. खूप खूप अभिनंदन.”

बॉलिवूडमध्ये काही होत असेल आणि कंगना त्याच्यावर बोलणार नाही असे कधी होतच नाही. चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींबद्दल कंगना तिचे मत व्यक्त करत असते. नुकतेच कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या स्टोरीमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख नसला तरी ती पोस्ट विकी आणि कॅटरीना यांच्या लग्नाशी संबंधित होती.

हेही वाचा-

‘सुपरस्टार’ शब्द देखील छोटा वाटावा असे स्टारडम मिळवणारे रजनीकांत अभिनयात आले तरी कसे?

लग्नाच्या वाढदिवशी अनुष्का शर्माने लिहिली खास पोस्ट; विराटही म्हणाला, ‘तू माझं आयुष्य आहेस.’

सनी लिओनीने मवाली स्टाईलमध्ये केला डान्स, चक्क लुंगी नेसून उडवली चाहत्यांची झोप


Latest Post

error: Content is protected !!