Saturday, March 2, 2024

‘पाकिस्तानी गायकांना बोलवण्यासाठी भारतीय परदेशात लग्न करतात’, राहत फतेही अली खानच्या वक्तव्याने उडाली खळबळ

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fatehi ALi Khan) सध्या अनेक वादांना तोंड देत आहेत. नुकताच या गायकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते एका व्यक्तीला चपलाने मारहाण करताना दिसत होता. व्हिडीओ पाहून असे दिसते की राहत फतेह अली खान बाटली हरवल्याने संतापले आहेत. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सर्वांनी गायकावर टीका करण्यास सुरुवात केली. आता राहत फतेह अली खान यांनी एक व्हिडिओ जारी करत या संपूर्ण प्रकरणावर माफी मागितली आहे. यासोबतच त्यांनी भारतीयांबाबत वादग्रस्त विधानेही केली आहेत.

ज्येष्ठ पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान हे परदेशात विवाहसोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या भारतीयांबद्दलच्या नुकत्याच केलेल्या टिप्पणीमुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. एका YouTuber सोबतच्या त्याच्या ताज्या मुलाखतीत, गायकाने सांगितले की भारतीय त्यांचे लग्न परदेशात आयोजित करतात जेणेकरून ते पाकिस्तानी कलाकारांना सादरीकरणासाठी आमंत्रित करू शकतील.

ते पुढे म्हणाले की, “भारतीयांना त्यांच्यासारख्या कलाकारांनी, आतिफ अस्लम आणि इतर पाकिस्तानी गायकांनी त्यांच्या लग्नात परफॉर्म करावे असे वाटते. आम्हाला भारतात जाण्याची परवानगी नाही, म्हणून लोक आम्हाला आमंत्रित करण्यापेक्षा परदेशी विवाहांना अधिक प्राधान्य देतात.”

गायक म्हणाले, “आम्ही भारतात जाऊ शकत नसल्यामुळे, भारतीयांनी त्यांचे लग्न परदेशात आयोजित करण्यास सुरुवात केली कारण भारत राहत फतेह अली खान, शफकत अमानत अली, आतिफ अस्लम यांना येऊ देत नाही की आम्ही तिथे जाऊन कार्यक्रम सादर करतो.”

दरम्यान, मारहाणीच्या व्हिडिओवर गायकाने माफी मागितली असून, ‘मला माफी मागायची आहे. सर्व प्रथम, मी माझ्या अल्लाह तला, माझा प्रभु यांच्याकडून क्षमा मागतो. अल्लाह मला माफ कर, ज्याने सर्व मानवांना समान केले. एक माणूस म्हणून मी इतर कोणत्याही माणसाशी असे वागू नये आणि कलाकार म्हणून मी असे वागू नये.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

राहाची मीडियाशी ओळख करून देण्याच्या मुलगी आणि जावयाच्या निर्णयावर महेश भट्ट यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मला आश्चर्य वाटले…’
‘बिग बॉस 17’च्या पराभवाचा अंकिता घेणार बदला, नागीण बनून अंकित गुप्तासोबत करणार रोमान्स? चर्चांना आले उधाण

हे देखील वाचा