Saturday, June 29, 2024

बिग बॉस १५ मधील ‘या’ स्पर्धकाला जिंकवण्यासाठी मतांमध्ये केला जातोय घोटाळा, माजी स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा

बिग बॉस हा शो नेहमीच सर्वात जास्त चर्चेत येणारा, सतत प्रकाशझोतात असणारा आणि वादांमुळे लोकांमध्ये गाजणारा शो म्हणून हा शो ओळखला जातो. बिग बॉसचे येणारे प्रत्येक पर्व कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गाजताना दिसते. सध्या बिग बॉसचे १५ वे पर्व सुरु आहे, आणि ते अंतिम फेरीकडे सरकत आहे. यादरम्यान शोमध्ये अधिक तडका आणण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जात आहे. यातच बिग बॉसमध्ये असा खुलासा केला आहे, जे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसणार आहे.

बिग बॉसमध्ये ‘वीकएंड का वॉर’ या भागात राहुल महाजन राखी सावंतला पाठिंबा देण्यासाठी आला होता. यादरम्यान राहुल महाजनने अशी गोष्ट सांगितली जी ऐकून सर्वच जणं हैराण झाले. राहुल यावेळी म्हणाला, “बिग बॉस १५’च्या वोटींगमध्ये मोठा गोंधळ सुरु आहे. राहुल महाजन व्यतिरिक्त घरातील इतर सदस्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक सेलेब्स देखील या घरात आले होते. यावेळी राहुल महाजनने राखी सावंतला सांगितले की, “यावेळी मी वोटींगसाठी पूर्ण सेटिंग केली असून तूच जिंकणार आहेस.”

यासोबतच राहुलने राखीला पुढे सांगितले, “कोणत्या पण बटनावर क्लिक केल्यानंतर मत तुला मिळेल. बाहेर वेटिंग बूथ लावले आहे. कोणी पण वोटिंगचे बटन दाबले की मत राखीलाच जाणार. मग ते मोबाईलवरून पण केले तरी असेच होईल. मुंबईच्या लिफ्टमध्ये देखील कोणी कोणतेही बटन दाबले तरी मत तुलाच जाणार.” यावर राखी म्हणते, “माझा तुझ्यावर विश्वास नाही.”

राहुल महाजन म्हणतो, “राखी तुझा नवरा कोणासोबत बसला होता. मी गेलो आणि त्याला खूप मारून आलो. आता तो तुझा फोटो घेऊन बसला असून रोज घरी तुझी हार घालून पूजा करतो.” यावर राखी म्हणते, “अरे मी अजून जिवंत आहे तू का माझ्या फोटोवर हार टाकून बसला आहेस. मी मेली तर नाही ना.”

या व्हिडिओला कलर्स चॅनेलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “राखी आणि राहुल यांच्यामध्ये ही मस्ती पाहून तुम्हाला बहीण भावाची आठवण येते का?”

हेही वाचा-

हे देखील वाचा