Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘नवराई माझी लाडाची लाडाची गं’ गाण्यावर थिरकला राहुल वैद्य; हळदी समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जेव्हापासून गायक राहुल वैद्यने अभिनेत्री दिशा परमारला लग्नासाठी मागणी घातली, तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाबद्दल अनेक बातम्या येत होत्या. त्यांच्या लग्नाच्या अनेक अफवा देखील उडवल्या गेल्या. त्यांच्या फॅन्सला तर या दोघांच्या लग्नाची कधीपासूनच उत्सुकता होती. अखेर तो क्षण आणि ती तारीख आली आहे. १६ जुलैला हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहे. त्याआधी दोघांच्याही घरी लग्नाआधीचे सर्व विधी सुरू झाले आहेत.

नुकतेच दिशाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो आणि व्हिडिओ फॅन्सच्या पसंतीस उतरले होते. नुकतेच राहुल आणि दिशाचा हळदीचा समारंभ संपन्न झाला. या  हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वूम्पलाने इंस्टाग्राम अकाऊंटवर राहुलच्या हळदीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुलला हळद लावली गेली असून, तो तसाच हळदीच्या अंगाने नाचताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CRWNEgCpQ2C/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओमध्ये राहुल ‘इंग्लिश विंग्लिश’मधील ‘नवराई माझी लाडाची’ या गाण्यावर त्याच्या मित्रांसोबत विचित्र डान्स करत आहे. लग्नाचा आनंद आणि उत्साह त्याच्या हळदीच्या चेहऱ्यातून देखील झळकताना दिसत आहे.

दुसरीकडे दिशाला देखील राहुलची हळद लागली आहे. तिच्या हळदीचे देखील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दिशाच्या देखील चेहऱ्यावर नववधूचे तेज आल्याचे दिसत आहे.

या दोघांचे संगीत फंक्शन देखील होणार असून, त्यांच्या या संगीत कार्यक्रमाच्या सरावाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. दरम्यान राहुलने बिग बॉस या शोमध्येच दिशाला लग्नाची मागणी घातली होती, आणि दिशाने देखील टीव्हीवरच त्याला होकार दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आज माझ्या ‘या’ पहिल्या बॉलिवूड चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण’, म्हणत सिद्धार्थ जाधवने दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा