Thursday, June 13, 2024

राहुल आणि दिशाने मुलीसोबत खेळताना गोड क्षण केले सोशल मीडियावर पोस्ट, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

दिशा परमार (disha parmar)आणि राहुल वैद्य नुकतेच पहिल्यांदा पालक झाले आहेत. दिशाने 20 सप्टेंबर 2023 रोजी एका मुलीला जन्म दिला. हे जोडपे अनेकदा त्यांच्या मुलीची झलक शेअर करतात ज्यामध्ये ते तिच्यासोबत वेळ घालवताना दिसतात. नुकताच दिशा परमारने राहुल वैद्यचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो आपल्या मुलीसोबत दिसत आहे.

दिशा परमारने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राहुल त्याच्या मुलीसोबत खेळताना दिसत आहे. मात्र, व्हिडिओमध्ये त्यांच्या मुलीचा चेहरा दिसत नाही. राहुल राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातलेला दिसतो, तर त्याची मुलगी प्रिंटेड लपंडामध्ये झाकलेली आहे. या क्यूट व्हिडिओला कॅप्शन देताना दिशाने लिहिले – ‘डॅडी ड्यूटी.’

दिशाने वडील-मुलीचे हे गोंडस क्षण टिपून चाहत्यांशी शेअर केले आहेत, तर राहुलने दिशाची एक क्लिपही पोस्ट केली आहे. या क्लिपमध्ये दिशा तिच्या मुलीसोबत काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि गुलाबी पॅन्ट घालून पोज देताना दिसत आहे. राहुलने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले – ‘एका सुंदर मुलीची खूप सुंदर आई.

दिशा परमार आणि राहुल वैद्य यांचा विवाह १६ जुलै २०२१ रोजी झाला होता. ते पहिल्यांदाच दिल्लीत एकमेकांना भेटले आणि याच दरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. यानंतर जेव्हा राहुल बिग बॉस 14 मध्ये गेला तेव्हा त्याने दिशाला तिच्या 26व्या वाढदिवसाला घरातूनच प्रपोज केले. त्यानंतर व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दिशाने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला त्याचे प्रपोस स्वीकारले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कपिल शर्मा झालाय इटालियन! नवीन लूक पाहून तुम्हीही हेच म्हणाल, एकदा पाहाच
त्या रात्री काय घडलं? तब्बल ५ वर्षांनी बोनी कपूर यांनी सांगितलं श्रीदेवीच्या मृत्यूचं रहस्य

 

हे देखील वाचा