मागील अनेक दिवसांपासून एक नाव प्रत्येकाच्या ओठावर खिळलं आहे, ते म्हणजे बिग बॉस फेम राहुल वैद्यचं. जवळपास एक महिन्यापासून त्यांच्या लग्नाची गडबड ऐकू येत होती. अखेर १६ जुलै २०२१ रोजी राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार यांचे लग्न थाटामाटात पार पडले आहे. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन देखील झाले. तसेच सत्यनारायणाची यथासांग पूजा करून त्यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली आहे. अशातच राहुल वैद्यचा एक व्हिडिओ समोर आला आहे. लग्नाचा अवघ्या काही दिवसांनंतर राहुल त्याच्या कामावर पुन्हा रुजू होताना दिसत आहे.
व्हायरल भयानीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पॅपराजी त्याला प्रश्न विचारताना दिसत आहेत. ते विचारतात की, “लग्नानंतर कसे वाटत आहे?” यावर राहुल उत्तर देतो की, “लग्न तर झाले, आता कामाला सुरुवात करत आहे. राहिलेली कामं चालू करत आहे. मला खूप आनंद होत आहे की, सगळ्यांनी आम्हाला एवढे आशीर्वाद दिले. आता राहिलेलं काम पूर्ण करत आहे.”
यानंतर पॅपराजी त्याला विचारतात की, “खूपच लवकरच काम चालू केले?” यावर तो म्हणतो की, “काम तर गरजेचं आहे ना.” यानंतर तो बाय, काळजी घ्या असे म्हणून त्याच्या गाडीकडे जातो. तो जात असतोच तितक्यात पॅपराजी म्हणतात की, “अली गोनीचे नवीन गाणे आले आहे.” यावर राहुल म्हणतो की, “हो आज मी पोस्टर पाहिला आहे. खूपच छान वाटत आहे. ऑल द बेस्ट दो फोन की फोन दो असं काहीतरी आहे.” यावर पॅपराजी म्हणतात की, “दो फोन.” पॅपराजी म्हणतात की, “गाणं दोन फोनवरुन शूट केले आहे.” यावर राहुल म्हणतो की, “बरं झालं तिसरा फोन नाही जोडला.” तेव्हा सगळे हसायला लागतात. (Rahul vaidya back to work after 8 days of wedding, give best wishes to ali goni’s new song)
त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याचे सगळे चाहते त्याला पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक झाले आहेत. तर काहीजण तो इतक्या लवकर काम का सुरू करत आहे, असे प्रश्न विचारत आहेत. राहुल वैद्य हा “बिग बॉस १४’ चा रनरअप विजेता होता. तसेच ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये देखील सहभागी झाला होता. सोशल मीडियावर राहुलची खूप फॅन फॉलोविंग आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा पहिल्यांदा तुटले होते नुपूर सेननचे हृदय; मन हलके करत म्हणाली, ‘मला रात्री एक वाजता…’
-ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खान नाही, तर ‘हा’ कलाकार करणार ‘बिग बॉस १५’ होस्ट
-मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण