ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खान नाही, तर ‘हा’ कलाकार करणार ‘बिग बॉस १५’ होस्ट


टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा आणि आवडता शो ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यायला तयार आहे. नुकतेच ईदच्या मुहूर्तावर शोचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला आहे. या शोच्या प्रीमियरमध्ये काही बदल बघण्यास मिळणार आहे. हा शो पहिल्यांदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सोबतच बिग बॉस प्रेमींसाठी आणखी एक बातमी आहे. ती म्हणजे पहिले सहा आठवडे सलमान खान हा शो होस्ट करणार नाहीये. तर त्याच्या जागी बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर हा शो होस्ट करणार आहे.

स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, करण जोहर हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर सलमान खानचा हा शो होस्ट करणार आहे. वूटने नुकतेच बिग बॉस ओटीटी प्रीमियरची घोषणा केली आहे. पहिले सहा महिने प्रेक्षकांना हा शो डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. म्हणजेच प्रेक्षक हा शो त्यांच्या वेळेनुसार कधीही पाहू शकतात. त्यामुळे बिग बॉस प्रेमींमध्ये आता आनंदाचे वातावरण पसरले आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी, सलमान खानचे ‘बिग बॉस १५’चा प्रोमो प्रदर्शित केला होता. या प्रोमोमध्ये सलमान खान हसत स्पर्धकांना सूचना देताना दिसत आहे. तो म्हणतो की, “यावेळी बिग बॉस एवढा क्रेझी आणि एवढा ओव्हर द टॉप असणार आहे की, त्याला थेट टीव्हीवरून बॅन केले जाणार आहे. टीव्हीवर मी होस्ट करणार आहे. त्याआधी सगळे वूटवर पाहतील.” (Karan Johar host Salman Khan’s bigg Boss show on OTT platform)

त्यामुळे हा सिझन काहीतरी वेगळा आणि इंटरेस्टिंग असणार आहे, असे वाटत आहे. या सिझनमध्ये ड्रामा, मनोरंजन, भावना या सगळ्याचे मिश्रण पाहायला मिळणार आहे. तसेच पहिल्यांदा हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी प्रेक्षक खूप उत्साहित आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय सिद्धार्थ शुक्लाचं नाव; तर काजोलच्या बहिणीचाही आहे यादीत समावेश

-सूर्याने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले खास गिफ्ट; शेअर केला ‘जय भीम’ सिनेमाचा फर्स्ट लूक

-‘सई आयुष्यात आली आणि…’, फोटो शेअर करत आदित्यने सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख


Leave A Reply

Your email address will not be published.