काही सिनेमे असे असतात, जे सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर जोरात आपटतात. मात्र, काही काळ लोटल्यानंतर त्याच सिनेमांची प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढते आणि ते त्या सिनेमाला डोक्यावरही घेतात. असेच काहीसे 1966 साली प्रदर्शित झालेल्या ‘तीसरी कसम’ या सिनेमाबद्दलही आहे. या सिनेमाची गणना क्सासिक सिनेमांच्या श्रेणीमध्ये होते. मात्र, हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला होता. प्रसिद्ध गीतकार यांची निर्मिती असलेला हा पहिला आणि शेवटचा सिनेमा होता. राज कपूर आणि वहीदा रहमान या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. तसेच, सिनेमाचे दिग्दर्शन बासू भट्टाचार्य यांनी केले होते.
असे म्हटले जाते की, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यामुळे शैलेंद्र यांना मोठा धक्का बसला होता. ते हा धक्का पचवू शकले नव्हते, त्यामुळे त्यांनी लवकरच या जगाचा निरोप घेतला होता.
बसलेला चित्रपटाचा धक्का
शैलेंद्र (Shailendra) यांना सिनेमात आणण्याचे श्रेय राज कपूर (Raj Kapoor) यांना जाते. शैलेंद्र यांनीच राज कपूर यांच्या सिनेमांसाठी गाणी लिहिली होती. विशेष म्हणजे, यासोबतच ते त्यांचे चांगले मित्रही होते. राज कपूर त्यांना कवीराज म्हणून बोलवायचे. हयात असताना शैलेंद्रच राज कपूर यांच्या सर्व सिनेमांसाठी गाणी लिहिली होती. त्यांनी ‘बरसात में हम से मिले तुम’, ‘आवार हूँ’, आणि ‘मेरा जूता है जापानी’ यांसारखी गाणी बॉलिवूडला दिली आहेत. ते त्यांच्या काळातील (50 आणि 60च्या दशकातील) सर्वात महागड्या गीतकारांपैकी एक होते. ते एका सिनेमासाठी त्यावेळी तब्बल 1 लाख रुपये मानधन घ्यायचे. गीतकार म्हणून नाव कमावल्यानंतर त्यांनी ‘तीसरी कसम’ सिनेमाची निर्मिती केली होती. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही.
विशेष म्हणजे, ज्यादिवशी राज कपूर यांचा जन्मदिन असतो, त्याच दिवशी त्यांचे जीवलग मित्र शैलेंद्र यांचे निधन झाले होते. तो दिवस होता (दि,14 डिसेंबर) 1966. त्यानंतर कधीच राज कपूर यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला नव्हता.
राज कपूर यांनी दिला होता सल्ला
‘तीसरी कसम’ ही बैलगाडी चालवणाऱ्या ‘हीरामन’ची कहाणी होती, जो हिराबाई (वहीदा रहमान) या नर्तकीच्या प्रेमात पडतो. राज कपूर (Raj Kapoor) यांनी हीरामन आणि वहीदा रहमान (Waheeda Rehman) यांनी हिराबाई हे पात्र साकारले होते. यापूर्वी या भूमिकांसाठी महमूद आणि मीना कुमारी यांची निवड केली जाणार होती. मात्र, नंतर राज कपूर यांनी मित्र शैलेंद्र यांच्यासाठी हा सिनेमा केला. त्यांनी फक्त एक रुपयात हा सिनेमा साईन केला होता. राज कपूर यांनी राजेंद्र यांना सल्ला दिला होता की, त्यांनी कशाप्रकारे सिनेमा त्यांच्या साहित्यिक अंदाजापासून वेगळे कमर्शियल पद्धतीने बनवावा. मात्र, त्यांनी ऐकले नाही आणि सिनेमा त्यांच्या पद्धतीनेच बनवला. पुढे हा सिनेमा प्रेक्षकांना आवडलाच नाही.
चांगली गाणी, चांगले दिग्दर्शन होऊनही हा सिनेमा फ्लॉप ठरला. मात्र, काळानुसार प्रेक्षकांना हा सिनेमा आवडू लागला आणि पुढे जाऊन हा क्लासिक सिनेमा म्हटला जाऊ लागला. 1967मध्ये या सिनेमाला सर्वोत्तम सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मात्र, दु:खद बाब अशी की, हे सर्व पाहण्यासाठी शैलेंद्र जिवंत नव्हते.
शैलेंद्र हे 1949 ते 1966 यादरम्यान सक्रिय होते. ते उत्तम हिंदी-उर्दू कवी होते. त्यांच्या राज कपूरसह संगीतकार जोडी शंकर- जयकिशन यांच्यासोबत केलेल्या कामाला वाहवा मिळाली होती. त्यांनी पन्नासच्या दशकातील जवळपास सर्व यशस्वी चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती.
अधिक वाचा-
–मजरूह सुलतानपुरी दोन वर्षे तुरुंगात लिहिली होती गाणी, राज कपूर यांनी दिले होते ‘इतके’ मानधन
–डिंपल कपाडिया राज कपूर आणि नर्गिस यांची मुलगी? वाचा काय आहे किस्सा