Thursday, June 13, 2024

‘गप्प बस! ती 2 लेकरांची आई…’, चाहत्याने नयनताराविषयी ‘तो’ प्रश्न विचारताच भडकला शाहरुख

सध्या अनेक नवीन चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. पुढील महिन्यात 7 सप्टेंबर रोजी बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याचा ‘जवान‘ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अशात एक महिना आधीपासूनच चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. यासोबतच शाहरुखही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत आहे. तसेच, त्यांच्या प्रश्नांची मजेशीर उत्तरे देत आहे. अशात गुरुवारी (दि. 10 ऑगस्ट) शाहरुख खानने ट्विटरवर आस्क एसआरके सेशन ठेवले होते. यादरम्यान एका चाहत्याने प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री नयनतारा हिच्याविषयी प्रश्न विचारताच शाहरुखने दिलेले उत्तर सध्या चर्चेत आहे.

नयनताराविषयीचा प्रश्न अन् शाहरुखचे उत्तर
शाहरुख खान (Shahrukh Khan) याला आस्क एसआरके ट्विटर सेशनमध्ये एकापेक्षा एक प्रश्न विचारले गेले. कुणी त्याला त्याच्या घराचे लाईट बिल विचारले, तर कुणी त्याला म्हातारेही म्हटले. मात्र, शाहरुखने जरजबाबी उत्तरे देत कुणाची बोलती केली, तर कुणावर प्रेमाचा वर्षावही केला. याच प्रश्नांमध्ये एका चाहत्याने नयनतारा (Nayanthara) हिच्याविषयी प्रश्न विचारला. तो म्हणाला की, “नयनतारा मॅमवर फिदा झाला की नाही…?”

या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने वेळ न घालवता लगेच उत्तर दिले की, “शांत बस! ती दोन मुलांची आई आहे. हा हा.” आता शाहरुखचे हे उत्तर सर्वत्र चर्चेत आहे.

तसं पाहिलं तर, शाहरुख त्याच्या चाहत्यांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो. मात्र, जर कुणी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तर तो समोरच्याला प्रेमाने उत्तर देण्यास मागेपुढे पाहत नाही. या सेशनदरम्यान एका युजरने त्याला वयावरून डिवचण्याचा प्रयत्न केला. यावर शाहरुखने त्याला प्रेमाने समजावून सांगितले.

युजरने विचारले की, “सर, जवान होण्याचे एक वय असते, पण तुमचे वय तर खूपच जास्त आहे.” या प्रश्नावर शाहरुखने हजरजबाबी उत्तर देत म्हटले की, “बरं झालं, आठवण करून दिली, आणखी एक लक्षात ठेव. मूर्ख असण्याचे कोणतेही वय नसते. हाहाहा.”

‘जवान’विषयी थोडक्यात
पुढील महिन्यात 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘जवान’ सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर या सिनेमाचे दिग्दर्शन ऍटली कुमारने केले आहे. तसेच, सिनेमाची निर्माती गौरी खान आहे. या सिनेमात शाहरुखव्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि योगी बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
लवकरच लग्नबंधनात अडकणार विजय देवरकोंडा! म्हणाला, ‘जोडीदार…’
रजनीकांत यांच्या ‘Jailer’चा बॉक्स ऑफिसवर राडा, पहिल्या दिवशी छापले तब्बल ‘एवढे’ कोटी

हे देखील वाचा