आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ खाणारे बॉलिवूड कलाकार मुलंबाळं होऊनसुद्धा काही काळानंतर वेगळे झाल्याचे आपण पाहिले आहे. यामध्ये ऋतिक रोशन आणि सुझेन खान यांच्या नावाचाही समावेश आहे. हे जोडपे एकेकाळी सर्वात रोमँटिक जोडप्यांमध्ये गणले जात होते. मात्र, 2014मध्ये मतभेदांमध्ये त्यांचे मार्ग वेगळे झाले. यावेळी वेगळे होताना रेहान आणि रिदान या दोन मुलांची आई बनलेल्या सुझेनने 400 कोटी रुपये पोटगी म्हणून मागितले होते, पण ऋतिकने तिला 380 कोटी रुपये दिले. हा जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक घटस्फोट आहे. दोघे त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. वेगळे झाले असले, तरीही त्यांच्यात आता मैत्रीचे चांगले संबंध आहेत. दोघेही एकमेकांच्या फोटोंवर कमेंट्स करताना दिसतात. अशात सुझेनची एक कमेंट चर्चेत आहे.
सुझेन खान (Sussanne Khan) ही अभिनेता अर्सलान गोनी (Arslan Goni) याला डेट करत आहे, तर ऋतिक रोशन सबा आझाद (Hrithik Roshan Saba Azad) हिला डेट करत आहे. ऋतिक गर्लफ्रेंड सबासोबत अर्जेंटिनामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. येथील एक फोटो सबाने शेअर केला आहे, ज्यावर ऋतिकचा एक्स पत्नी सुझेनने लक्षवेधी कमेंट केली आहे.
सबाची पोस्ट
सबाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ऋतिक रोशन आणि सबा आझाद (Hrithik Roshan And Saba Azad) एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसत आहेत. दोघांचा लेटेस्ट रोमँटिक फोटो सर्वत्र व्हायरल होत असून चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यावर ऋतिकची एक्स पत्नी सुझेननेही कमेंट करत लिहिले की, “ब्युटीफुल पिक.” म्हणजेच सुंदर फोटो. ऋतिकने घेतलेल्या या सेल्फीवर आता 46 हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे.
View this post on Instagram
खरं तर, ऋतिक आणि सबा (Hrithik And Saba) कथितरीत्या मागील वर्षाच्या सुरुवातीपासून एकमेकांना डेट करू लागले होते. सबा नेहमी ऋतिकसोबत त्याच्या कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावते. इतकेच नाही, तर सुट्ट्यांमध्येही सबा ऋतिकच्या कुटुंबासोबत दिसते.
ऋतिक आणि सबाच्या कामाविषयी थोडक्यात
‘कहो ना प्यार है’ सिनेमातून पदार्पण करणारा ऋतिक रोशन शेवटचा सैफ अली खान याच्यासोबत ‘विक्रम वेधा’ सिनेमात दिसला होता. आता तो ‘फायटर’ या आगामी सिनेमात दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्यासोबत दिसणार आहे.
याव्यतिरिक्त ऋतिकच्या खात्यात ‘वॉर 2’ सिनेमादेखील आहे. यामध्ये ज्युनिअर एनटीआर याचीही मुख्य भूमिका आहे. दुसरीकडे, गायिका-संगीतकार सबा आजाद हिने ‘दिल कबड्डी’ आणि 2011सालच्या ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ सिनेमात काम केले आहे. ती ‘फील्स लाईक्स इश्क’ या नेटफ्लिक्स अँथोलॉजीचाही भाग होती. ती अखेरची ‘रॉकेट बॉयझ 2’ वेबसीरिजमध्ये दिसली होती. (girlfriend saba azad shared a romantic picture with boyfriend hrithik roshan and ex wife sussanne khan commented see here)
महत्त्वाच्या बातम्या-
‘गप्प बस! ती 2 लेकरांची आई…’, चाहत्याने नयनताराविषयी ‘तो’ प्रश्न विचारताच भडकला शाहरुख
लवकरच लग्नबंधनात अडकणार विजय देवरकोंडा! म्हणाला, ‘जोडीदार…’