बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने आपल्या सुंदर गायिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. . 90 च्या दशकापासून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र, नुकतंच श्रेयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन धक्कादयक खुलासा केला आहे. श्रेया एका कॉन्सटमध्ये गाणे गात असताना तिच्यासोबत एक धक्कादयक घटना घडली.
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिने आपल्या सोशल मीडियाद्ववारे तिच्या सोबत एका कॉन्सट दरम्यान घडलेल्या घटने बद्दल माहिती दिली आहे. सलग कॉन्सटमधये व्यस्त असणारी गायिका श्रेया हिचा एका कॉन्सटमध्ये गाणे गायल्यानंतर तिचा आवाज पूर्णपणे गेला. त्यामुळे श्रेयाला त्वरित दवाखान्यात दाखल केले
मात्र, आता काळजी घेण्याची गरज नाही. ती आता पुर्णपणे ठिक आहे.या घटनेची पुर्ण माहिती स्वत: श्रेयाने दिली.
ऑरलॅंडो येथे एका कॉन्सटमध्ये गाणे गायल्यानंतर अचानकच श्रेयाचा आवज पुर्णपणे गेला होता. तिच्या गळ्यातून आवज येणंच बंद झालं होतं डॉक्टरांच्या उपचारानंतर ती आता ठिक आहे. त्यानंतर तिने एका कॉन्सटमध्ये गाणे देखिल गायले. अशी माहिती तिने सांगितली. श्रेयाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देत सांगितले की, “आज मी खूप भवनिक झाले आहे. माझं माझ्या कुटुंबावर आणि बॅंड टीमवर खूप प्रेम आहे. त्यांनी मला पाठिंबा दिला आणि मी पुन्हा उभा राहिले. कोणतीही कठीण परिस्थिती माझ्या समोर आली, तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी या व्यक्तींनी मला मदत केली.” असं तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गैंग्स ऑफ वासेपुर’ फेम डेफनिटवर आरोप, रांची पोलिस्टेशनमध्ये गुन्हा दाखल
बॉलिवूडच्या अपयशावर सैफ अली खानने तोडले मौन, सांगितलं ‘हे’ मोठं कारण