Friday, July 5, 2024

सुष्मिता सेनच्या वहिणीने दिला दुराव्याच्या बातम्यांना पुर्णविराम, शेअर केली ‘अशी’

हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) भाऊ राजीव सेन (Rajiv Sen) आणि त्याची पत्नी चारु असोपामध्ये (Charu Asopa) दुरावा झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत होत्या. या दोघांमध्ये सगळकाही ठीक नसल्याची माहिती समोर येत होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता या सगळ्या अफवांना पुर्णविराम देत, चारु असोपाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सगळीकडे चर्चेत आहे. कोणती आहे ही खास पोस्ट चला जाणून घेऊ. 

गेल्या काही दिवसांपासून राजीव सेन आणि चारु असोपाच्या नात्यात आलबेल नसल्याची बातमी सगळीकडे चर्चेत होती. इतकेच नव्हे, तर दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्राम अकाउंटवरुन अनफॉलो केल्याने या बातमीने आणखीनच जोर धरला होता. मुलगी जियानाच्या जन्मानंतर आपल्या माहेरी गेलेली असोपा आजपर्यंत मुंबईला आली नाही. त्यामुळे दोघे वेगळे होतात की काय, अशी चर्चा रंगली होती. मात्र आता असोपाने शेअर केलेल्या पोस्टमुळे या सगळ्या बातम्यांना पुर्णविराम मिळाला आहे. ही पोस्ट चारु असोपा आणि राजीव सेनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली आहे. यामध्ये चारु आणि राजीव सेन आपल्या छोट्या मुलीसोबत म्हणजेच जियानासोबत होळी खेळत असल्याचे दिसत आहे.

हे व्हायरल फोटो चारु आणि राजीवने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यावेळी राजीव सेनने “जियानाची आपल्या आई बाबांसोबत पहिली रंगपंचमी, तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा.” असा कॅप्शन दिला आहे. तर चारुनेही तिघांचा फोटो शेअर करत चाहत्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये चारुने गुलाबी रंगाचा सुट घातला आहे, तर राजीवने निळ्या रंगाचा टि शर्ट घातल्याचे दिसत आहे.त्यांच्या या व्हायरल फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री सुष्मिता सेनच्या मुलीने या फोटोवर प्रतिक्रिया देताना किती गोड अशी कमेंट केली आहे. हा फोटो त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडल्याचे दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा