गरोदरपणात हाय हील्स घालून सुष्मिता सेनच्या वहिनीने लावले ठुमके; नेटकऱ्यांनी दिले चांगलेच सल्ले


मागील काही काळापासून चारू असोपा ही अभिनेत्री खूपच चर्चेत आली आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनच्या लहान भावासोबत लग्न केलेली चारू मागच्या अनेक वर्षांपासून सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. टेलिव्हिजन क्षेत्रात अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या चारुला जेवढी लोकप्रियता अभिनय करताना मिळवता आली नाही, तेवढी लोकप्रियता किंबहुना त्याहून अधिक लोकप्रियता चारुला तिच्या लग्नानंतर मिळाली.

जून २०१९ मध्ये चारूने राजीव सेनसोबत लग्न केले आणि अचानक ती लाईमलाईटमध्ये आली. मालिकांमध्ये अतिशय साध्या, सोज्वळ मुलीची भूमिका साकारणाऱ्या चारूने लग्नानंतर तिची एक वेगळीच ग्लॅमरस आणि बोल्ड बाजू दाखवली. तेव्हापासून चारू सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी चारू सध्या एका वेगळ्या आणि अतिशय गोड कारणासाठी चर्चेत आली आहे.

चारू लवकरच आई होणार आहे. ती तिचा आताचा हा काळ खूपच आनंदाने जगत आहे. तिने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अक्षय कुमार आणि करीना कपूर यांच्या ‘ऐतराज’ सिनेमातील ‘गिला गिला दिल गिला गिला’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रेग्नेंसीच्या काळात चारुच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो अगदी स्पष्ट दिसत आहे. चारूने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, “प्रेग्नेंसी हा काही आजार नाहीये. हा स्त्रियांचा पुनर्जन्म आहे. त्यामुळे हा काळ एन्जॉय करा पण काळजी घेऊन.”

चारुचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी चारुला काही सल्ले दिले आहेत. या व्हिडिओमध्ये चारू हाय हिल्स घालून डान्स करत असल्याने तिला या काळात हाय हिल्स न घालण्याचे बरेच सल्ले आले आहेत.

चारू आई होणार असल्याची बातमी अभिनेत्री सुश्मिता सेनने सोशल मीडियावर पोस्ट टाकत दिली होती. चारूची डिलिव्हरी याचवर्षी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. सध्या चारू तिचा हा गोल्डन काळ एन्जॉय करण्यात मग्न आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय


Leave A Reply

Your email address will not be published.