राजीव सेन आणि चारू असोपा गेल्या वर्षभरापासून घरगुती वादामुळे चर्चेत होते. अशात दोघांनीही एकमेकांवर जोरदार आरोप केले. दरम्यान, या जोडप्याने त्यांच्या मुलीचा विचार करून एकमेकांना अनेक संधी दिल्या परंतु गोष्टी हव्या तश्या घडल्या नाहीत. त्यानंतर दोघांनी कायदेशीर विभक्त होण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता आणि अखेर 8 जून रोजी राजीव आणि चारू यांचा घटस्फोट झाला.
चारूशी घटस्फोट घेतल्यानंतर लगेचच राजीवने बीटीशी बोलून चारूसोबत परत येण्याची इच्छा व्यक्त केली. चारू आणि राजीव यांनी त्यांची मुलगी जियानासाठी कॉडियल राहण्याबाबत बोललं होतं. अशात आता दोघेही नुकतेच फादर्स डेनिमित्त एकत्र येताना दिसले, ज्यामुळे घटस्फोटानंतरही दोघांच्या जवळीकीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
खरे तर, फादर्स डे निमित्त चारू आणि राजीव सेन यांनी एकत्र जेवण केले आणि व्हिडिओसोबत सेल्फीही काढले. यादरम्यान, चारू आणि राजीव रोमँटिक अंदाजात मस्ती करताना दिसले. राजीव जिआनाला फादर्स डेच्या निमित्त शाॅपिंगला घेऊन गेला. यादरम्यान चारूनेही राजीवसोबत बराच वेळ घालवला.
View this post on Instagram
चारूने फादर्स डे साठी एक सुंदर केक देखील आणला होता, ज्यावर लिहिले होते, “माझ्याकडे एक हिराे आहे आणि मी त्याला बाबा म्हणते.” यादरम्यान राजीवने जियानासोबत केक कापला.
या सगळ्यात राजीवने त्याच्या व्लॉगमध्ये सांगितले की, त्याला चारूसोबत काम करायचे आहे आणि त्याने तिला एक वेब सीरिजही ऑफर केली आहे, ज्यामध्ये तो आहे. तो म्हणाला, “मी चारूला या प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. जर ती यात माझी सह-अभिनेत्री असेल, तर मला खूप आनंद होईल. अर्थातच मी तिला खूप चांगली भूमिका देईन. स्क्रिप्ट अप्रतिम आहे. मला खात्री आहे की, ती स्क्रिप्ट वाचेल. चारू आणि मी व्यावसायिकरित्या एकत्र काम केलेले नाही. आम्ही एकत्र खूप व्लॉगिंग केले आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी ही एक ट्रीट असेल.” असे राजीवने आपल्या व्लाॅगमध्ये सांगितले.(rajeev sen and tv actress charu asopa spending time together after divorce couple did a lot of outing with daughter on fathers day)
अधिक वाचा-
Death Anniversary: अनिता गुहा यांचा शेवटचा काळ होता वेदनादायक, अभिनेत्री आजार लपवण्यासाठी घ्यायची हेव्ही मेकअपचा आधार
लग्नानंतर 11 वर्षांनी रामचरणच्या घरात चिमुकल्या बाळाचे आगमन, व्हिडिओ एकदा पाहाच