Sunday, December 3, 2023

लग्नाच्या तीन वर्षानंतर चारु अन् राजीव सेनचा घटस्फाेट; लेक जीयानाची कस्टडी मिळाली ‘या’ व्यक्तीला

टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि मॉडेल राजीव सेन हे त्यांच्या घटस्फोटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. अखेर आज या जोडप्याचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे. खरे तर, आज 8 जून 2023 रोजी या जाेडप्याच्या  घटस्फोटाची अंतिम सुनावणी होती आणि आता त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. अलीकडेच राजीवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चारूसोबतचा एक फोटो शेअर करून घटस्फोटाची पुष्टी केली. काय सांगितले राजीवने? चला, जाणून घेऊया…

राजीव सेन (rajeev sen) आणि चारू असोपा (charu asopa) आता कायमचे वेगळे झाले आहेत. या जोडप्याचा आज म्हणजेच गुरुवारी (8 जून)ला कायदेशी घटस्फोट झाला आहे. राजीवने इन्स्टाग्रामवर चारूसोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘इथे अलविदा नाही. जरी दोन लोक एकमेकांसोबत कायम राहू शकत नाहीत, तरी त्यांच्यात प्रेम नेहमीच राहिण. आम्ही आमच्या मुलीसाठी नेहमीच आई आणि बाबा राहू.” फोटोमध्ये, राजीव हसताना आणि चारूला मिठी मारताना दिसत आहे.

Rajeev Sen
Rajeev Sen

चारू असोपा आणि राजीव सेन यांचे 2019मध्ये लग्न झाले. या लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये मतभेद झाले आणि राजीव अन् चारूमध्ये भांडणं हाेऊ लागले. यादरम्यान दोघांनी आपले नाते सुधारले आणि काही काळानंतर त्यांच्या आयुष्यात मुलगी जियाना आली. मात्र, असे असले तरी ते कायमचे वेगळे झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

राजीव यांची मुलगी जियाना तिची आई चारूसोबत राहते. चारूने नुकतेच मुंबईत नवीन घर घेतले आहे, ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावरही शेअर केली हाेती. गेल्या महिन्यात तिने मुलगी जियानासोबत नवीन घरात प्रवेश केला, ज्याचा व्हिडिओ साेशल मीजियावर चांगलाच व्हायरल झाला हाेता.(tv actress charu asopa rajeev sen got divorced after three years of marriage charu asopa and rajeev sen separated )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चांदीची पालखी चमकायला लागलीय’, अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
एका हातात युग, तर दुसऱ्या हातात न्यासा; घामात लदबद झालेल्या काजाेलचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा