Tuesday, January 31, 2023

जेव्हा दिग्दर्शकाने ट्विंकल खन्नाकडे केली होती ‘ही’ चुकीची मागणी; ‘या’ शब्दांत सुनावले तिने खडेबोल

सुप्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिच्या चतुराई आणि तटस्थ भूमिकेमुळे ओळखली जाते. तिने आपल्या कारकिर्दीमध्ये 13 चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयामध्ये तिला रस तर होता, परंतु तिचे चित्रपट फारसे हिट होत नव्हते. त्यामुळे तिने अभिनय सोडून लेखिका होणे पसंत केले. सध्या ती अभिनयामध्ये नसली, तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करते. अभिनय करत असताना तिच्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग आला होता, त्यावेळी तिने दिग्दर्शकांना चांगलेच खडेबोल सुनावले होते.

ट्विंकलच्या उत्तराने दिग्दर्शकांची बोलती झाली बंद
अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या आयुष्यातील एका घटनेचा खुलासा केला आहे. तिने दिग्दर्शक राज खोसला यांना एक दिवस चांगलेच फटकारले होते. त्यांनी तिच्याकडे एक चुकीची मागणी केली होती. त्यामुळे तिला राग अनावर झाला होता. तिने कसला ही विचार न करता तिला योग्य वाटले ते उत्तर दिले होते. (Actress twinkle khanna once gave a befitting reply to a director who asked her to give bold scene)

वहीदा रहमान यांनी विचारला भूतकाळातला प्रश्न
ट्विंकल नुकतीच एका टीव्ही शोमध्ये दिग्गज अभिनेत्री वहीदा रहमान यांना भेटली. यावेळी दोघींनी या शोमध्ये खूप गप्पा मारल्या. वहीदा यांनी तिला राज खोसला यांच्या बरोबर झालेल्या वादाविषयी एक प्रश्न विचारला. त्यावेळी ती उत्तर देत म्हणाली की, “मी ‘मेला’ चित्रपटाचा एक सीन शूट करत होते. तेव्हा दिग्दर्शक तिथे गुरुदत्त सारखी शाल घेऊन माझ्या जवळ आले. त्यांनी मला विचारले की, तू मंदाकिनी सारखा सीन करणार का? मी त्यांना म्हणाले माझं पहिल उत्तर तर नाही आहे आणि दुसर म्हणजे तुम्ही राज कपूर नाही. माझं हे उत्तर ऐकून त्यांनी गप्प राहणे पसंत केले. त्यानंतर त्यांनी मला या विषयावर कधीच काहीच विचारले नाही. परंतु त्यांनी या नंतर मला त्यांच्या कोणत्याही चित्रपटामध्ये काम दिले नाही.”

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, “त्या सीनमध्ये मी एक पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तसेच मला पावसात एक डान्स करायचा होता. या साठी मी तयार होते. मला खात्री होती की हा चित्रपट चालेल.” ट्विंकलने हा चित्रपट चालला नाही, तर अक्षय कुमारला लग्न करण्याचे वचन दिले होते. पुढे काय झाले ते आपल्या सर्वांना माहीतच आहे.

अभिनेत्री मंदाकिनीने ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामध्ये खूप बोल्ड सीन दिले होते. तिने यामध्ये फक्त एक पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. हा सीन तिला एका धाबधब्या खाली उभे राहून द्यायचा होता. त्यावेळी राज कपूर यांनी सेंसर बोर्ड कडून परवानगी कशी घेतली याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ट्विंकल खन्नापासून ते साहिल खानपर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींवर लागलाय फ्लॉप कलाकाराचा ठपका

‘मी पत्नीच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही’ अभिनेता अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाबद्दल केला मोठा खुलासा

हे देखील वाचा