Thursday, December 5, 2024
Home बॉलीवूड ‘शेवटच्या क्षणापर्यंत राजासारखे जगले, पण…’, मित्र प्रकाश मेहरांनी दिला राजेश खन्ना यांच्या आठवणींना उजाळा

‘शेवटच्या क्षणापर्यंत राजासारखे जगले, पण…’, मित्र प्रकाश मेहरांनी दिला राजेश खन्ना यांच्या आठवणींना उजाळा

सिनेसृष्टीमधे असे अनेक मोठे दिग्गज कलाकार आहेत, जे आजच्या घडीला इंडस्ट्रीमध्ये जवळपास सर्वच सुपरस्टार आहे. मात्र, या सर्वात मोठ्या बॉलिवूड इंडस्ट्रीचे सर्वात पहिले सुपरस्टार हा किताब मिळवणारे अभिनेते म्हणजे राजेश खन्ना. एकापाठोपाठ एक १५ सुपरहिट सिनेमे देणारे काका उर्फ राजेश खन्ना यांनी जे स्टारडम अनुभवले आणि जी प्रसिद्धी मिळवली, ती आजतागायत कोणालाच मिळवता आली नाही. अशा या महान नटाने १८ जुलै, २०१२ साली या जगाचा निरोप घेतला. त्याच्या स्मृतिदिनी त्यांचे मित्र असलेल्या प्रकाश मेहरा यांनी तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

प्रकाश मेहरा हे एका म्युझिक कंपनीचे मालक तर आहेतच, सोबतच ते राजेश खन्ना यांचे मित्र आणि बिझनेस पार्टनरसुद्धा होते. प्रकाश यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “राजेश खन्ना हे अतिशय मस्त मौला स्वभावाचे व्यक्ती होते. ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत अगदी राजासारखे जीवन जगले. त्यांच्यासारखा उदार माणूस मी माझ्या संपूर्ण जीवनात नाही पहिला. मीडियामध्ये त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल जी छबी होती, ती साफ खोटी होती. मी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा एक पुरावा आहे.”

पुढे प्रकाश म्हणाले, “राजेश खन्ना नेहमी म्हणायचे आम्ही खत्री आहोत. खत्री मुलींकडून काही घेत नाही, तर मुलींना भरभरून देतात. डिंपल या शेवटच्या श्वासापर्यंत राजेश खन्ना यांच्या सेवेत होत्या. चोवीस तास त्या काकांची काळजी घेत होत्या. ते आजारी पडल्यानंतर त्यांची बॉण्डिंग दिसली. अक्षय कुमार तर त्यांना मित्रासारखा होता.”

काका आणि डिंपल यांचा एक किस्सा सांगताना प्रकाश म्हणाले, “एकदा डिंपल आणि काका एका रेडिओ स्टेशनला मुलाखतीसाठी गेले होते, तेव्हा डिंपल यांना एका श्रोत्याने त्यांच्या सौंदर्याचे गुपित विचारले, तेव्हा राजेश खन्ना यांनी माईक स्वतःकडे घेतला आणि म्हणाले, ‘मी आहे.’ एकदा ट्रीपला जाण्यासाठी डिंपल यांनी काकांसाठी शॉपिंग केली. त्यात त्यांनी काकांसाठी त्यांची आवडती सिगारेट आणि गॉगल आणले. मात्र, काका ते घालण्यासाठी तयारच नव्हते. डिंपल यांनी खूप आग्रह केल्यानंतर त्यांनी ते घातले आणि विचारले, ‘दिसतोय ना राजेश खन्ना यांच्यासारखा?’ काकांनी त्यांच्या डॉक्टरांना ‘आनंद’ चित्रपटाची डीव्हीडी भेट म्हणून दिली होती. त्यांना त्यांचे आयुष्य आनंद सिनेमासारखेच वाटायचे.”

काकांच्या मित्रांबद्दल प्रकाश म्हणाले, “त्यांना त्यांच्या मित्रांनी खूप निराश केले होते. ज्या लोकांसाठी मित्रांसाठी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला काका उभे राहिले, तेच नंतर त्यांना पुरेनासे झाले. काका नेहमी म्हणायचे, या क्षेत्रात नाती शुक्रवार ते शुक्रवार बदलतात. एकदा त्यांनी जीवनगौरव पुरस्कार अमिताभ यांच्याकडून स्वीकारल्यानंतर मीडियाने त्यांना विचारले की तुम्ही सोबत काम करणार का? त्यावर ते म्हणाले की, का नाही? मात्र, निर्माता पाहिजे.”

काकांचे असे अनेक किस्से आणि गोष्टी इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत. राजेश खन्ना यांनी नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच १८ जुलै, २०१२ या जगाचा निरोप घेतला. आज जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ते कायम चाहत्यांच्या मनात असतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा