जुन्या प्रियसीला चुकीची जाणीव व्हावी यासाठी, लग्नाच्या दिवशी राजेश खन्ना यांनी तिच्या घरावरून नेली होती वरात


आज (२९ डिसेंबर) राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार हे मनाचे स्थान मिळवलेल्या राजेश खन्ना यांच्याबद्दल जितके सांगावे तितके कमी आहे. अमाप यश, पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवणाऱ्या राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीतील प्रत्येक घटनाच अविस्मरणीय आणि लक्षवेधी ठरली. सलग १५ सिनेमे सुपरहिट देणाऱ्या राजेश खन्ना यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्य देखील तुफान गाजले. आपल्या वैयक्तिक आयुष्यात त्यांची प्रेमप्रकरणं तर सर्वात जास्त चर्चेचा विषय होते. राजेश खन्ना यांचे रोमँटिक आणि भुरळ घालणाऱ्या व्यक्तिमत्वात अनेक तरुणीच्या काय तर अभिनेत्री देखील जीव ओवाळून टाकायच्या. मात्र राजेश खन्ना यांचा जीव अडकला होता, अभिनेत्री अंजु महेंद्र यांच्यामध्ये. राजेश खन्ना आणि अंजु महेंद्र यांची प्रेमकहाणी तुफान गाजली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, मात्र मधेच माशी शिंकली आणि त्या दोघांचे नाते तुटले. दोघे वेगळे झाले आणि राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न करण्याचे ठरवले. या लग्नाच्या दिवशी देखील राजेश खन्ना अंजु यांना विसरले नव्हते. आपल्याच लग्नाच्या दिवशी अंजु महेंद्र यांना कायम लक्षात राहील आणि त्यांचे नाते तुटल्यानंतर राजेश खन्ना किती खुश होते हे जाणवून देण्यासाठी राजेश खन्ना यांनी त्यांच्या लग्नाच्या दिवशी असे काही केले की, सर्वच उपस्थित लोकं आश्चर्यचकित झाले. वाचा हा किस्सा नक्की काय आहे.

बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांना आज कोण ओळखत नाही. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटांच्या गेल्या कित्येक पिढ्या अजूनही फॅन आहेत. त्यांचे अनेक सिनेमे आजही टीव्हीवर लागतात तेव्हा काहीजण असेही आहेत जे हातातली कामं टाकून टीव्ही समोर बसतात. तर काही जण मोबाईलवर जसा वेळ मिळेल तसा त्यांचे सिनेमे पाहत असतात. अशा या बॉलिवूडच्या काकांनी ‘आराधना’, ‘दो रास्ते’, ‘खामोशी’, ‘सच्चा झूठा’, ‘गुड्डी’, ‘कटी पतंग’, ‘सफर’, ‘दाग’, ‘अमर प्रेम’, ‘प्रेम नगर’, ‘आनंद’ या आणि अशा अनेक चित्रपटांमधून आपल्याला रोमान्स करायला शिकवलं, आपलं मनोरंजन केलं. लाखो तरुणांना चित्रपटांद्वारे रोमान्स करायला शिकवणाऱ्या राजेश खन्ना यांची स्वतःची लव्हस्टोरी मात्र चांगलीच फसली होती. आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत.

राजेश खन्ना यांचा सुपरस्टारडम कदाचित फार काळ टिकू शकला नसेल, परंतु कमी काळामध्ये लोकांमध्ये त्यांची अशी क्रेझ पाहायला मिळाली होती, जी हिंदी चित्रपटांमधील कोणत्याही अभिनेत्याला पुन्हा पाहायला मिळाली नाही. इंडस्ट्रीमध्ये लोक राजेश खन्ना यांना प्रेमाने काकांच्या नावाने हाक मारत असत. तरुण मुली तर त्यांच्या पांढर्‍या कारचं चुंबन घेत असत आणि जिथून राजेश खन्ना जात तिथल्या त्यांच्या पायांच्या ठष्यांमधली माती स्वतःच्या कपाळी कुंकू म्हणून लावत असत. इतका वेडेपणा, इतकं प्रेम त्यावेळी राजेश खन्ना यांच्यावर तरुणाई करत होती.

जरी राजेश खन्ना यांच्यावर बर्‍याच मुली प्रेम करत असत, पण ते मात्र अभिनेत्री अंजू महेंद्रूशी अगदी जवळ होते. वास्तविक अंजू आणि राजेश हे बालपणीपासून एकमेकांचे मित्र होते. दोघांनीही कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेतले. मग या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले. परंतु, हळूहळू या नात्यामध्ये मतभेद होऊ लागले. राजेश खन्ना अंजूसाठी टिपिकल भारतीय बॉयफ्रेंड बनले होते. अंजू यांनी मॉडेलिंग करू नये अशी त्यांची इच्छा होती.

तेव्हा माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अंजू यांनी सांगितलं होतं की, “राजेशचा एक चित्रपट फ्लॉप काय गेला, तो रागात खूप तडफडत होता. तो अतिशय मुडी प्रकारचा माणूस होता. मी नेहमी त्याच्या पायात पडून राहावं अशी त्याची इच्छा होती. जसे त्याचे चमचे पडतात. मी तिच्यावर प्रेम केलं होतं, पण त्याची चमची होऊ शकले नाही.”

दोघांनीही ब्रेकअप केलं होतं. अंजु सोबत ब्रेकअपनंतर राजेश यांनी त्यांच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केले. असं म्हटलं जातं की, राजेश खन्ना यांच्या लग्नाची वरात वांद्रेहून जुहूकडे जात असताना, त्यांनी मुद्दामच आपला मार्ग बदलला, जेणेकरून अंजू महेंद्रूला यांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव व्हावी.

राजेश खन्ना यांनी प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केले आणि त्यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या. राजेश खन्ना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात खूप एकटे झाले होते. ते कॅन्सरने ग्रस्त होते. १८ जुलै २०१२ रोजी या सुपरस्टारने जगाचा निरोप घेतला. अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, मृत्यूच्या वेळी राजेश खन्ना यांचे शेवटचे शब्द होते ‘टाइम अप’, ‘पॅक अप’!

rajesh khanna and dimpal kapadia
rajesh khanna and dimpal kapadia

तर अशी होती सुपरस्टार राजेश खन्ना यांची लव्ह स्टोरी! आजही राजेश खन्ना यांच्या चित्रपटांमधील गाणी त्यांचे सिनेमांमधील संवाद हे आजही अनेकांच्या तोंडी सहज ऐकायला मिळतात.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!