तब्बल सात सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर राजेश खन्ना देणार होते जीव, ‘त्या’ रात्रीचे दृश्य पाहून घाबरली होती पत्नी डिंपल


हिंदी सिनेमाचे दिग्गज सुपरस्टार राजेश खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये सलग 15 हिट चित्रपट देण्याचा रेकॉर्ड  केला होता जो आजपर्यंत कोणताही अभिनेता मोडु शकलेला नाही. एक काळ असा होता की अनेक मुली राजेश खन्नाच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या आणि यामुळे निर्माते त्यांना त्यांच्या चित्रपटात आणण्यासाठी रांगा लावत असत. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार हे येतच असतात आणि तसाच काळ राजेश खन्नाच्या आयुष्यातही आला ,जेव्हा त्यांचे सलग 7 चित्रपट फ्लॉप झाले होते. राजेश खन्ना यांच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ होता.

1976मध्ये राजेश खन्नाचा ‘महाचोर’ हा चित्रपट वाईट रीतीने फ्लॉप झाला. याच चित्रपटापासून पडद्यावर त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले होते आणि त्याचबरोबर घरातही पत्नी डिंपलशी त्यांचे संबंध ठीक नव्हते. ‘महाचोर’ नंतर त्यांचा पुढील रिलीज झालेला पुढचा सिनेमा ‘बंडलबाज’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरीमुळे पडला. हिट चित्रपट देण्याची सवय असलेले राजेश खन्ना या फ्लॉपच्या व्यथा सहन करू शकत नाहीत.

दुसरीकडे अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये जबरदस्त चित्रपट देत होते. पडद्यावर लांब कद काठी असलेला, ज्याच्या चेहऱ्यावर कमीत कमी स्मित आणि राग जास्त असेलला असा अभिनेता जेव्हा प्रेक्षकांसमोर आला तेव्हा चाहत्यांनी या नवीन अवताराला चांगलीच पंसती दर्शविली. अमिताभ बच्चनच्या रागावलेला तरुण लूकने (ऍंग्री यंग मॅन)  चित्रपटसृष्टीत नाविन्यता आणली आणि त्याचे प्रेक्षकांनी कौतुकही केले. त्यांचे चित्रपट हिट होत चालले होते आणि 1975 मध्ये आलेल्या ‘शोले’ने तर यशाचे नवे विक्रम केले.

एकीकडे अमिताभ हिट होत होते, तर दुसरीकडे राजेश खन्नाचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले होते. राजेश खन्नाला अजूनही त्यांच्या रोमँटिक छबीवर विश्वास होता. दोन चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर राजेश खन्नाला ‘महबूबा’ चित्रपटाकडून खूप अपेक्षा होती कारण शक्ती सामंतसोबत त्यांचे शेवटचे 3 चित्रपट बरेच हिट झाले होते. अशा परिस्थितीत हा चित्रपट चालेल अशी त्यांना खात्री होती, पण तसे झाले नाही. सुरुवातीला या चित्रपटाला काही प्रेक्षक मिळाले पण हळूहळू तेही कमी झाले.

यानंतर राजेश खन्ना यांचे पुढचे 5 चित्रपटही जबरदस्त फ्लॉप ठरले आणि याचा त्यांना जबरदस्त धक्का बसला. फ्लॉपला विसरण्यासाठी राजेश मद्याच्या आहारी जाऊ लागले. असे म्हणतात की एका रात्री राजेश खन्ना उशिरापर्यंत मद्यपान करत होते. दररोजप्रमाणे काकाला वगळता त्यांची पत्नी डिंपल आणि स्टाफ झोपायला गेले. त्या रात्री जोराचा पाऊस पडत होता आणि अचानक राजेश खन्नांचा आवाज आला. त्यांचा आरडाओरड ऐकून डिंपल आणि घरातील कर्मचारी गच्चीवर पोहोचले तेव्हा त्यांना काका जोरात रडताना दिसले. डिंपल ते दृश्य पाहून खुप घाबरली होती.

यासिर उस्मानी यांच्या म्हणण्यानुसार राजेश खन्ना त्यांच्या बिघडलेल्या कारकीर्दीने इतके खचले होते की ते आत्महत्या करण्याचा विचार करू लागले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की डिप्रेशनमुळे त्यांनी आत्महत्येबद्दल विचार करण्यास सुरवात केली. त्यांनी समुद्रात बुडण्याचे देखील ठरविले, परंतु शेवटी त्यांनी आपले विचार बदलले. राजेश खन्नाने यश आणि अपयश दोन्ही पाहिले आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण जगला. एवढे दु:ख असतानादेखील ते ठामपणे उभे राहिले आणि आनंद मरणार नाही हे त्याने सिद्ध केले.


Leave A Reply

Your email address will not be published.