सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. रजनीकांतची क्रेझ सिनेसृष्टीपासून ते खऱ्या आयुष्यापर्यंत पाहायला मिळते. त्यांचा एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की चित्रपटगृहांमध्ये उत्सवाचे वातावरण असते. थलैवाला सोशल मीडियावर फॉलो करणारे बरेच लोक आहेत, जे त्यांच्यासारखी स्टाईल आणि स्वॅग स्वीकारतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये एक व्यक्ती हुबेहुब रजनीकांत सारखा दिसत आहे, रजनीकांतच्या दिसणाऱ्या या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे, आणि यावर अनेक कमेंट्सही येत आहेत. विशेष म्हणजे या व्यक्तीची चालण्याची शैली हुबेहुब रजनीकांत यांच्यासारखी आहे. दुरून पाहिल्यावर तो हुबेहूब रजनीकांतसारखा दिसतो.
रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड आहे. 71 वर्षीय रजनीकांत यांचा शेवटचा रिलीज झालेला ‘अन्नते’ हा चित्रपट होता, ज्याच्या कथेने प्रेक्षकांच्या मनाला खोलवर स्पर्श केला. या चित्रपटात रजनीकांतसोबत नयनतारा आणि कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या नात्याची अप्रतिम कथा होती. OTT वरही याला उदंड प्रतिसाद मिळाला.
रजनीकांत यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती आणि त्यांनी शाळेत महाभारतातील एकलव्याची भूमिका साकारली होती. रजनीकांत यांनी बंगळुरू परिवहन सेवेत बस कंडक्टर म्हणून काम केले आणि याच काळात ते थिएटरशीही जोडले गेले. दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या सल्ल्याने त्यांनी तमिळ भाषा शिकून त्यांच्या चित्रपटात काम केले. अशा प्रकारे तो साऊथचा सुपरस्टार बनला.(rajinikanth doppelganger video will shock you)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘तो’ बॉलिवूड अभिनेता नसता, तर रजनीकांत यांनी कधीच हवेत फेकली नसती सिगारेट
यश ते रजनीकांत, साऊथचे ‘हे’ सुपरस्टार फाडफाड बोलतात हिंदी; बॉलिवूडकरांच्याही आहेत खूपच पुढे