Thursday, April 25, 2024

यश ते रजनीकांत, साऊथचे ‘हे’ सुपरस्टार फाडफाड बोलतात हिंदी; बॉलिवूडकरांच्याही आहेत खूपच पुढे

आता बॉलिवूडपेक्षा टॉलिवूड सिनेमांना प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळताना दिसत आहे. साऊथच्या अभिनेत्यांची क्रेझ हिंदी सिनेसृष्टीत वाढत चालली आहे. अनेक साऊथ सुपरस्टार्सचे सिनेमे हिंदी व्हर्जनमध्ये चित्रपटगृहात तुफान गाजत आहेत. यापैकी काही कलाकारांचे सिनेमे हे हिंदीत डब करून चित्रपटगृहात पोहोचले आहेत. मात्र, तुम्हाला माहितीये की, यापैकी काही कलाकार हे स्वत:देखील चांगली हिंदी बोलतात. या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावरच नाही, तर हिंदी भाषा बोलूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या लेखात आपण त्याच कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, जे चांगली हिंदी बोलतात. चला तर सुरुवात करूया…

हिंदी बोलणारे साऊथ कलाकार
यश
‘केजीएफ’ सिनेमामुळे अभिनेता यश (Yash) याने अफाट लोकप्रियता मिळवली. तो देशाच्या घराघरात पोहोचला आहे. त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याचे ‘केजीएफ’ या सिनेमाच्या दोन्ही भागांनी हिंदी सिनेसृष्टीला हादरून सोडले आहे. मात्र, या सिनेमांना यशने त्याचा आवाज दिला नाहीये. सिनेमाच्या दोन्ही भागात यशच्या डायलॉग्जला डब आर्टिस्टने आवाज दिला आहे. मात्र, असे असले तरीही यशही चांगली हिंदी बोलतो. त्याने सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान हिंदीतही मुलाखती दिल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

राम चरण
सन २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाने हजार कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. हिंदीतही हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमासाठी मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता राम चरण (Ram Charan) याने त्याचे डायलॉग्ज स्वत:च हिंदीत डब केले होते. त्याच्या हिंदीमध्ये कोणीही चुका शोधू शकला नाही.

ज्युनिअर एनटीआर
राम चरणसोबतच ‘आरआरआर’ या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) याचाही या यादीत समावेश आहे. त्यानेही या सिनेमासाठी स्वत:च त्याचे हिंदी डायलॉग्ज म्हटले होते. दोन्ही कलाकार एकदम चांगली हिंदी बोलतात. दोघांनीही हिंदीमध्येच मुलाखती दिल्या होत्या.

विजय देवरकोंडा
सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा ‘लायगर’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. हा सिनेमा २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील त्याचे डायलॉग्ज विजयने स्वत:च डब केले आहेत. प्रदर्शनापूर्वीच त्याच्या या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

रवी तेजा
साऊथ सुपरस्टार रवी तेजा (Ravi Teja) हादेखील याबाबतीत मागे नाहीये. त्याने त्याच्या हिंदीत प्रदर्शित झालेल्या सिनेमांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. तो उत्तम हिंदी बोलतो. त्याने साऊथच्या प्रेक्षकांसोबतच हिंदी प्रेक्षकांच्याही मनात खास जागा निर्माण केली आहे.

धनुष
सुपरस्टार धनुष (Dhanush) याने बॉलिवूडमधील सिनेमात काम केले आहे. त्यात ‘रांझणा’ आणि ‘अतरंगी रे’ या सिनेमांचा समावेश आहे. या सिनेमांतून त्याने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. धनुषही चांगली हिंदी बोलतो. त्याने या सिनेमांतील डायलॉग्ज स्वत: बोलले होते.

आर माधवन
तमिळ स्टार आर माधवन (R Madhavan) हा साऊथच्या प्रेक्षकांसोबतच हिंदी प्रेक्षकांचाही आवडता अभिनेता आहे. त्याने त्याच्या ‘रेहना है तेरे दिल में’, ‘थ्री इडियट्स’ यांसारख्या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याची हिंदी या सिनेमांमधून आपण ऐकलीच आहे. तो त्याच्या प्रत्येक हिंदी सिनेमातील डायलॉग्ज स्वत:च बोलतो.

कमल हासन
तब्बल 60 वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रिय असणाऱ्या कमल हासन (Kamal Haasan) हेदेखील चांगली हिंदी बोलतात. त्यांनी ‘चाची 420’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘विक्रम’ यांसारखे सिनेमे हिंदी प्रेक्षकांना दिली आहेत. ते स्वत:च त्यांचे सर्व डायलॉग्ज डब करतात. यामुळेच कमल हासन हे हिंदी प्रेक्षकांचे आवडते अभिनेते आहेत.

रजनीकांत
‘थलायवा’ म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत हे बॉलिवूडच्या खान सुपरस्टारच्याही पुढे आहेत. आजही त्यांच्या स्वॅगमुळे त्यांचे हिंदी सिनेमे तुफान चालतात. रजनीकांत यांनी ‘हम’, ‘चालबाज’, ‘बुलंदी’ यांसारख्या हिंदी सिनेमात काम केले आहे. त्यातून त्यांची हिंदी किती चांगली आहे, हे समजते.(south stars yash ram charan to jr ntr these actors speak good hindi see list)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
काजल अगरवालच्या सिंपल लूकने चोरली लाइमलाइट, फोटोंचा सोशल मीडियावर कहर
जरा इकडे पाहा! नव्या अन् सिद्धांत कारमध्ये दिसले एकत्र; नजर पडताच लाजली बिग बींची नात

हे देखील वाचा