आपल्या दमदार अभिनयाने कंगना रणौतने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशात सध्या कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट रसिक प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकत आहे. तिच्या या चित्रपटाला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच या चित्रपटासाठी तिच्या चाहत्यांसह मोठमोठे अभिनेते आणि अभिनेत्री देखील तिच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. नुकतेच अभिनेते रजनीकांत यांनी तिला शुभेच्छा देत तिचे कौतुक केले आहे.
गेली अनेक दशके दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये, तसेच बॉलिवूडमध्ये दमदार अभिनय आणि यशस्वी चित्रपट देणारे रजनीकांत यांनी ‘थलायवी’ चित्रपटबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. एका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांनी कंगनाचे आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांचे कौतुक करत असे म्हटले आहे की, “हा चित्रपट बनवणे खरंच खूप कठीण होते. परंतु विजय यांनी हा चित्रपट उत्तमपणे रुपेरी पडद्यावर दाखवला.” पुढे ते असेही म्हणाले की, “एमजीआर आणि जयललिता यांच्यासारख्या विद्यमान व्यक्तींची भूमिका निभावणं खरच खूप कठीण आहे. कारण या दोन्ही व्यक्तींनी अभिनय तसेच राजकीय वर्तुळात खूप नाव कमावले आहे. या सर्वांना कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी खूप उत्तम निभावले आहे.” (Rajnikant saw Kangana Ranaut film Thalaivi and appreciate for her acting)
ए. एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ चित्रपटामध्ये जयललिता यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीपासून ते राजकीय कारकिर्दीपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. चित्रपटामध्ये अरविंद स्वामी यांनी एमजी रामचंद्र यांची भूमिका निभावली आहे. चित्रपटाचे निर्माते विष्णु इंदुरी, शैलेश सिंग आणि ब्रिन्दा प्रसाद हे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट १० सप्टेंबरला प्रदर्शित करण्यात आला. सध्या तामिळ भाषेत चित्रपट प्रदर्शित झालेला असून हिंदीमध्ये नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केले जाणार आहे. तसेच लवकरच हा चित्रपट ओटीटीवर देखील पाहता येणार आहे.
जयललिता यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांना कशा पद्धतीने खडतर प्रवास करावा लागला, हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले असून प्रेक्षकांपर्यंत सर्व काही उत्तम पणे पोहचवण्यासाठी दमदार डायलॉग देखील या चित्रपटासाठी लिहिले आहे. ‘वो फिल्म वाली हमे बतायेगी की, राजनीति कैसे की जाती है’ ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या या डायलॉगमुळे हिंदी भाषिक चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्याआधी दिग्दर्शक आणि सिनेमागृह व्यावसायिकांमध्ये वाद झाले होते. अभिनेत्री कंगना कायमच तिच्या निर्भीड वक्तव्यांनी वादाच्या विळख्यात सापडते. अशात या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी देखील कंगनाने काही वक्तव्ये केली होती, त्यामुळे ती बरीच चर्चेतही होती आणि ट्रोलर्सच्या रडारवर देखील होती. कंगनाचा आतापर्यंतचा प्रवास देखील फार खडतर आहे. ती तिच्या अभिनयाने दमदार चित्रपट देण्यास नेहमी सज्ज असते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा
-लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा