मनोरंजन क्षेत्रात काही अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्ट किंवा व्हिडिओमुळेच जास्त चर्चेत असतात. यामध्ये उर्फी जावेद आणि राखी सावंत यांची जोडी नेहमीच आघाडीवर असते. उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते तर राखी सावंत तिच्या विवादित वक्तव्यामुळे सोशल मीडियावर झळकत असते. आता या दोघींचाही एक भन्नाट व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आणि उर्फी जावेद (Urfi Javed) दोघीही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या कपड्यांची, विवादास्पद वक्तव्याची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. आता या दोघींचाही एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी आणि उर्फी कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. त्यानंतर दोघींनी आपल्या खास शैलीत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राखीने गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील डायलॉगही बोलून दाखवला. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. अनेकांनी दोघींना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे, तर काही जणांनी त्यांच्या या व्हिडिओचे कौतुक केले आहे.
राखी आणि उर्फीच्या या व्हायरल व्हिडिओवर त्यांंच्या चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी त्यांना दोघीही बकवास आहेत असे म्हणत ट्रोल केले आहे तर अनेकांनी त्यांना नमुना आहेत असे म्हटले आहे. यावेळी दोघींच्याही कपड्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान राखी सावंत आणि उर्फी दोघीही बिग बॉसच्या घरातून प्रसिद्ध झाल्या होत्या. दोघींनीही या कार्यक्रमात धमाल केली होती .