Friday, April 19, 2024

मुंबईमध्ये एका ग्रँड पेज ३ पार्टीमध्ये एकत्र आले दोन मोठे विवादित स्टार राखी सावंत आणि फैजान अंसारी

बॉलिवूडमध्ये पार्टी कल्चर मोठ्या प्रमाणावर चालते हे तर सर्वांनाच माहित आहे. सर्वात बॉलिवूडमध्ये दररोज मोठमोठ्या पार्टीज होत असतात. कलाकार नेहमीच वेगवगेळ्या पार्ट्यांमध्ये स्पॉट केले जातात. नुकतीच बॉलिवूडमध्ये एक मोठी पेज थ्री पार्टी झाली या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील मोठमोठे कलाकार सामील झाले होते. यावेळी जरीन खान, रश्मि देसाई, फैजान अंसारी (Faizan Ansari), निक्की तांबोळी, जान कुमार शानु, अपारशक्ति खुराना, राखी सावंत (Rakhi Sawant) आदी अनेक कलाकार या पार्टीत सामील झाले. आता जिथे राखी सावंत तिथे धमाल, मजा, मस्ती होणार यात वादच नाही. जिथे राखी तिथे तिचेच चर्च हे जणू समीकरण बनले आहे. या पार्टीच्या निमित्ताने दोन विवादित सेलिब्रिटी एकत्र आलेले दिसले. एक तर ड्रामा क्वीन राखी सावंत आणि दुसरा फैजान अंसारी.

मागील काही काळापासून फैजान अंसारी सतत मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. शाहरुख खान, लता मंगेशकर यांचा वाद असो, शहनाज गिल वाद असो किंवा देशात सर्वात जास्त गाजणार हिजाबचा वाद असो फैजान अंसारी हे नाव प्रत्येक वादात ऐकू येतच आहे. याशिवाय राखी सावंत तर काय नेहमीच तिच्या विवादित, हटके वक्तव्यांनी ती सतत प्रकाशझोतात येते. स्वतःला मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवण्याची एकही संधी ती सोडत नाही. या पार्टीला असे हे दोन्ही कलाकार एकत्र आले.

याशिवाय एका माहितीनुसार सलमान खानची बहीण श्वेता रोहिरासोबत फैजान अंसारी बॉलिवूडमध्ये जोरदार पदार्पण करणार आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध मासिकात फैजान अंसारी सलमान खानची बहीण श्वेता रोहिरासोबत धमाकेदार एन्ट्री मारणार आहे. श्वेता रोहिरा हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. अनेक वेबसिरीज आणि फॅशन शोमध्ये तिने काम केले आहे. तर कर्नाटकमधील हिजाब वाद हा जेव्हा संपूर्ण भारतात गाजला तेव्हा या विरोधात फैजान अंसारीने आवाज उठवला होता. फैजान अंसारीला तर एका वादामध्ये पोलिसांनी अटक देखील केली होती. या वादावर शबाना आजमी, उर्मिला मातोंकर, कंगना रानौत आदी कलाकारांनी देखील त्यांचे मत दिले होते. या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सामील झाले होते. अशा पार्ट्यांमध्ये असे लोकं देखील दिसतात जे विविध विवादांमध्ये अडकलेले असतात.

हे देखील वाचा