Friday, April 26, 2024

आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी  

आज ८ मार्च जागतिक महिला दिन. जगभरात आज महिलांच्या संघर्षाच्या, प्रेरणेच्या अनेक कहाण्या सांगितल्या जातात. महिला सुरक्षेतेसाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात. मात्र कितीही महिला सुरक्षेच्या गप्पा मारल्या, महिलांच्या अभिमानाच्या गोष्टी केल्या तरी आजही महिला सुरक्षा आणि महिला अत्याचाराच्या बातम्या ऐकायला मिळतात. देशात आजही अनेक क्षेत्रात महिलांवर अत्याचार होतात. यामध्ये चित्रपटसृष्टी देखील मागे नाही. नेहमीच महिलांच्या सन्मानाचे चित्रपट काढणाऱ्या बॉलिवूडमध्येच अनेक दिग्गज अभिनेत्रींना हिंसाचाराला बळी पडावे लागले आहे. कोण आहेत या अभिनेत्री, चला जाणून घेऊ. 

काही वर्षापुर्वी हिंदी चित्रपट जगतात ‘मी टू’ च्या वादळाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. चित्रपट जगतातील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला होता. यापैकी अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार झाले आहेत. यामध्ये अनेक अभिनेत्रींनी याविरोधात आवाज उठवत न्यायालयात दाद मागितली होती.

जीनत अमान  (zeenat aman) –

प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान यांनाही अशा प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागले  होते. जीनत अमान यांना त्यांच्या पतीने संजय खानने इतकी मारहाण केली होती की त्यांचा जबडा तुटला होता. त्यांच्या डोळ्यालाही मोठी जखम झाली होती. या प्रकरणाची त्याकाळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पतीनेही तिला मारहाण केली होती.

Photo Courtesy: Instagram/sonytvofficial

ऐश्वर्या राय (Aishwarya rai)-

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या प्रेमप्रकरणाची चित्रपट जगतात चांगलीच चर्चा रंगली होती. दोघेही  अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होते मात्र वाद आणि भांडणे यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले. दोघांचे प्रेमाचे नाते संपल्यानंतर ऐश्वर्याने सलमान खान विरोधात मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे गंभीर आरोप केले होते. इतकेच नव्हेतर तिने पोलिसात तक्रारदेखील दाखल केली होती.

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) – 

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीलाही आपल्या पतीकडून मारहाण करण्यात आली होती. तिला पती राजा चौधरीने दारुच्या नशेत खूप मारहाण केली होती. त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यांनी १९९८ मध्ये लग्न केले होते. मात्र वाढत्या मतभेदामुळे २०१२ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत विवाह केला मात्र याच कारणाने तिचे हे नातेही संपुष्टात आले.

युक्ता मुखी (Yukkti mookhey) –

माजी मिसवर्ल्ड युक्ता मुखीनेही लग्नाच्या पाच वर्षानंतर आपल्या पतीविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये तिने हुंड्यासाठी छळ आणि अनैसर्गिक शारीरिक संबंधाचा आरोप केला होता.

करिश्मा कपूर (Karishma Kapoor) –

हिंदी चित्रपट जगतातील यशस्वी अभिनेत्री करिश्मा कपूरलाही अशा प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागले होते.  करिश्माने २००३ मध्ये उद्योजक संजय कपूरसोबत विवाह केला होता. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकु शकले  नाही. दोघांनीही २०१२ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी करिश्माने आपल्या पतीवर मारहाणीचे आरोप केले होते.

हे देखील वाचा