Bigg Boss 15: ‘या’ स्पर्धकसोबत गुपचूप रोमान्स करत होती रश्मी देसाई, मात्र राखी सावंतने पकडली चोरी!


प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’च्या घरात आणखी एक प्रेमकहाणी सुरू झाली आहे. अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) आणि उमर रियाझ (Umar Riaz) यांच्यात जवळीक वाढू लागली आहे. रश्मीने अलीकडेच उमरला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या. तसेच, या जोडप्याचे रोमान्स करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

रश्मी ‘बिग बॉस १५’ मध्ये उमर रियाझवर मनापासून प्रेम व्यक्त करताना दिसली आहे. या जोडप्याच्या चाहत्यांकडून त्यांच्या रोमान्सचे फोटो खूप पसंत केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. रश्मी आणि उमर सोफ्यावर बसलेले असताना दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचे पाहिले गेले.

त्यांचा रोमान्स राखी सावंतच्या नजरेपासून लपून राहू शकला नाही. प्रेम व्यक्त करताना तिने दोघांना रंगेहाथ पकडले. ‘बिग बॉस १५’ मध्ये सध्या देवोलीना आणि रश्मी देसाई यांच्यातील कटुता स्पष्टपणे दिसत आहे. अलीकडच्या एका एपिसोडमध्ये पाहिले गेले की, रश्मी रात्री देवोलीनाबद्दल उमरशी बोलत होती. यावेळी, दोघे एकाच सोफ्यावर बसले होते, तेव्हा रश्मीने उमरला मिठी मारली. दोघांमधील हा खूप रोमँटिक क्षण होता. पण, राखी सावंत त्या दोघांकडे आरशाच्या पलीकडून बघत होती. हे पाहिल्यानंतर राखीने दोघांसोबत मस्करी करत त्यांना चिडवायला सुरुवात केली.

रश्मी-उमरच्या रोमान्समध्ये कबाबमध्ये हड्डी बनलेल्या राखीने त्यांना विचारले की, “इथे प्रेम केले जात आहे का?” यावर उमर म्हणाला, “काय करू, हवामानच असे आहे.” उमरचे असे बोलणे ऐकून रश्मी हसते. त्याचवेळी राखीनेही तिच्याच स्टाईलमध्ये मस्ती केली आणि रश्मी ही रेशमची ब्लँकेट असल्याचे म्हटली.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!