राखी सावंतने देवाकडे केली तक्रार; म्हणाली, ‘एक लाख फॅन्स तर दिलेस, पण…’


बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन म्हणजेच अभिनेत्री राखी सावंत. ही तिच्या अनेक गोष्टींमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकवेळा ती कॉफी शॉपमध्ये, रस्त्यावर स्पॉट झाली आहे. त्यावेळी ती पॅपराजींसमोर असे वक्तव्य करते ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. कधी कधी तर ती रियॅलिटी शोच्या विजेत्याचे नाव देखील आधीच सांगून टाकते. मागील काही दिवसांपासून तिचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. तिचा असाच एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. यात ती देवाकडे तक्रार करताना दिसत आहे. तिचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. (Rakhi Sawant complaint to god, video get viral)

राखी सावंतने तिचा हा मजेशीर व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, राखी पत्रकारांशी बोलताना दिसत आहे. अचानक ती वर बघून देवाकडे तक्रार करताना दिसत आहे. ती म्हणजे की, “अरे देवा तू रोज मला एक लाख चाहते देतो, परंतु ते एक लाख चाहते मला इंस्टाग्रामवर लाईक का नाही करत?” तिचे हे बोलणे ऐकून मागून एक पत्रकार म्हणतो, “करतील करतील नक्की करतील.” हा व्हिडिओ शेअर करून राखीने लिहिले आहे की, “रचनात्मक गोष्टी पाहिजे ही माझ्या चाहत्यांची मागणी आहे. यामुळे आम्ही आज इथे सगळ्या मसालेदार गोष्टी घेऊन आलो आहोत. आशा करते की, तुम्हाला पुन्हा एकदा हे आवडेल.” तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

राखी सावंतच्या या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ५७ हजारपेक्षाही जास्त वेळा पाहिले आहे. तसेच या व्हिडिओवर ४२० पेक्षाही जास्त कमेंट आल्या आहेत.

राखी सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतेच तिचे ‘ड्रीम मे एंट्री’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. राखी ही ‘बिग बॉस १४’ नंतर खूप चर्चेत आली. सध्या तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.