Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड बिनधास्त अंदाजाने राखी सावंतने पुन्हा एकदा जिंकले प्रेक्षकांचे मन, ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर पावसात लावले ठुमके

बिनधास्त अंदाजाने राखी सावंतने पुन्हा एकदा जिंकले प्रेक्षकांचे मन, ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर पावसात लावले ठुमके

बिग बॉस’ फेम आणि बॉलिवूडमध्ये ‘ड्रामा क्वीन’ या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. सध्या लॉकडाऊनमुळे सगळे कलाकार घरातच आहेत. तरीही ते वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन करत असतात. पण लॉकडाऊन असतानाही राखी सावंत अनेक वेळा रस्त्यावर स्पॉट झाली आहे. यामुळे ती सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आता देखील राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती पावसात डान्स करत एन्जॉय करताना दिसत आहे.

व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल‌ भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून राखीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मुंबईमधील पाऊस बघून एवढी खुश होते की, पॅपराजीसमोर येऊन पावसात डान्स करू लागते. या व्हिडिओमध्ये ती स्वतः ‘टिप टिप बरसा पाणी’ हे गाणे गाताना दिसत आहे. ती तिच्या अंदाजात डान्स करत आहे. यावेळी पॅपराजींनी तिचा हा डान्स त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

त्यावेळी सर्वांना बघून राखी म्हणते की, “काय बघत आहात तुम्ही सगळे?” बिग बॉसमध्ये धमाल केल्यानंतर आता राखी सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. आजकाल तिचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रेक्षकांना खूप आवडत असतात, तर सगळेजण तिच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत असतात. तसेच अनेकजण तिच्या बिनधास्त स्वभावाचे कौतुक देखील करत असतात.

राखी सावंतच्या या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे की, “हाहाहा राखी खूपच मनोरंजक आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “मला समजत नाही की, तुला पसंत करू की, नापसंत करू? जशी पण आहेस तशी बिनधास्त आहे.” आणखी एका युजरने तिला ‘स्ट्रेस बस्टर’ असे संबोधले आहे.

या व्हिडिओमध्ये राखीने पोल्का डॉट शर्ट, लोवर आणि शूज परिधान केले आहेत. ती ज्या अंदाजात डान्स करत आहे, ते पाहून समजत आहे की, ती मुंबईचा पाऊस खूप एन्जॉय करत आहे. तिच्या याच बिनधास्त अंदाजाने तिने प्रेक्षकांच्या मनात घर बनवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’

-उर्वशीच्या पोटात एका व्यक्तीने दणादण मारल्या बुक्क्या; त्रास होत असूनही अभिनेत्रीने गपगुमान केले सहन

-जेनेलियासोबत रितेश करत होता रोमान्स; तिचा हात समजून केले ‘या’ दिग्दर्शकाच्या हातावर किस, पुढं काय झालं पाहाच…

हे देखील वाचा