अरे देवा! ‘ही’ आहे राखी सावंतची सवत, मुलाखतीत रितेशबाबत केले हैराण करणारे खुलासे


‘बिग बॉस १५’ (Bigg Boss) आता चांगलेच रंगात आले आहे. या पर्वात अनेक ट्विस्ट आले, अनेक घडामोडी घडतही आहेत. बिग बॉसमध्ये अलिकडेच राखी सावंत आणि तिचा पती रितेश यांची एन्ट्री झाली. राखी आणि रितेशचा घरात प्रवेश झाल्यानंतर, रितेश आणि त्यांच्या नात्यावर अनेक प्रश्न उठवले जात आहेत. अशातच एक महिला समोर आली आहे आणि जी सांगत आहे की, ती रितेशची पत्नी आहे आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. त्याची पत्नी स्निग्धा प्रियाने नुकतेच एका मुलाखतीत रितेशबाबत अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. जे ऐकून सगळेच हैराण झाले आहे.

रितेशची पत्नी स्निग्धा प्रियाने असे सांगितले आहे की, राखी सावंतचा पती तिचा पहिला पती आहे आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. हे ऐकून राखी सावंतचे चाहते आता अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. तिने सांगितले की, रितेश कधीही परदेशात गेला नाही आणि तो व्यावसायिक देखील नाहीये. राखीने भाड्याचा पती आणला आहे, या गोष्टीची चर्चा चालू होती आणि आता या गोष्टीची सगळ्यांना खात्री पटू लागली आहे. (rakhi sawant husband ritesh first wife snigdha priya shocking revelations)

मुलाखतीत तिने रितेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे. स्निग्धाने सांगितले की, १ डिसेंबर २०१४ साली बिहारमध्ये तिचे आणि रितेशची लग्न झाले होते. लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. तिने सांगितले की, रितेशची आर्थिक स्थिती एवढी काही चांगली नाहीये. तसेच वैयक्तिक आयुष्यात तो खूपच उद्धट व्यक्ती आहे. तिने सांगितले की, रितेशने तिला कधीही मन मोकळेपणाने आयुष्य जगू दिले नाही.

स्निग्धाने पुढे सांगितले की, “मी त्याच्याशी शेवटची सप्टेंबर-ऑक्टोबर (२०२१) मध्ये बोलले आहे. मी त्याला कॉल केला नव्हता परंतु आम्ही चॅटिंगवर बोललो आहोत. आमची चॅटिंग नकारात्मक होती की, मला घटस्फोट हवाय अशी वैगेरे. मी त्याला म्हणाले की, तू तर तुझे आयुष्य अगदी आनंदात जगत आहे. दोन वर्षात मी कधी पाहायला देखील आले नाही की, तू काय करत आहेस आणि कोणासोबत राहतोस. तेव्हा त्याने सांगितले की, माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठे स्वप्न आहे की, मला खूप मोठा राजकीय नेता बनायचे आहे. तेव्हा मी त्याला सांगितले की, तुला जे हवंय ते कर मी तुला कधी अडवले आहे. तेव्हा त्याने उत्तर दिले की, आपल्यावर एक केस चालू आहे तेच कारण आहे.”

रितेशच्या पत्नीने सांगितले की, २०१७ मध्ये त्यांची पूर्ण फॅमिली आली होती, तेव्हा एका छोटाशा गोष्टीवरून तिला मारले होते. तिच्या डाव्या डोळ्याला अजूनही त्याची खून आहे. तेव्हा त्यातून रक्त देखील येत होते. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन टाके घातले होते. तिने सांगितले की, “रात्री १० ते २ वाजेपर्यंत तो मला पट्टयाने मारत होता. त्यावेळीचा फोटो माझ्याकडे अजूनही आहे. मी त्यावेळी चेन्नईमध्ये होते. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहचले तेव्हा मी तेथील नर्सकडून मोबाईल घेतला आणि पप्पांना कॉल केला.”

तिने पुढे सांगितले की, “लग्नानंतर अनेक छोटे-मोठे वाद होत होते. परंतु नंतर रोजच आमची भांडण होऊ लागली. तो मला रोज मारत होता. तेव्हा माझा भाचा मला म्हणाला की, आत्या आता काय करायचे? तेव्हा मी त्याला म्हणाले की, मला जायचे आहे. नाहीतर हा मला मारून टाकेल. मी तेथून निघाले तेव्हा मला रस्त्यात कॉल आला की, तू माझे सर्टिफिकेट आणि सोने दागिने घेऊन पळून गेली आहे आणि आता मी पोलिसांकडे जाणार आहे.”

स्निग्धा प्रियाने सांगितले की, जेव्हा लग्नाची बोलणी चालू होती तेव्हा त्याच्या घरच्यांनी सांगितले की, आमचा मुलगा आयटीआयमध्ये आहे, ४ लाख कमावतो, बंगळुरूमध्ये राहतो आणि नंतर आमच्याकडून ३० लाख हुंडा मागितला. स्निग्धा प्रियाने तिच्या मुलाखतीत सांगितलेल्या या गोष्टींमुळे आता राखी सावंत आणि तिच्या पतीची जोरदार चर्चा चालू आहे. तसेच आता खरंच राखी आणि रितेशचे लग्न झाले आहे का? असे अनेक प्रश्न सगळे उपस्थित करत आहेत.

हेही वाचा :

 


Latest Post

error: Content is protected !!