Friday, March 29, 2024

‘IMDb 2021’च्या टॉप चित्रपटांच्या यादीत ‘जय भीम’ पहिल्या क्रमांकावर; सूर्या म्हणाला, ‘…गोष्टी थरकाप उडवतात’

कोरोनामुळे खूप महिने सिनेमागृह बंद होते. दिवाळीच्या निमित्तावर सर्व सिनेमागृह उघडण्यात आले. त्यानंतर ‘जय भीम’ (Jay Bheem) या चित्रपटाने सिनेमागृहात हजेरी लावली. याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद देखील दिला. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. तर दुसरीकडे चित्रपट, टीव्ही शो आणि सेलिब्रिटीबद्दल माहितीसाठी आईएमडीबी (IMDB) हा जगातील सर्वात लोकप्रिय स्त्रोत आहे. नुकतीच आयएमडीबीने २०२१च्या टॉप रेटिंग चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा ‘जय भीम’ चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. आईएमडीबीची टॉप १० चित्रपटांची यादी काही अशाप्रकारे आहे.

१. जय भीम(Jay Bheem), २. शेरशाह (Shershah), ३. सूर्यवंशी (Sooryawanshi), ४. मास्टर (Master), ५. सरदार उधम(Sardar Udham), ६. मिमी (Mimi), ७. कर्णन (Karnan), ८. शिद्दत (Shiddat), ९. दृश्यम २ (Drishyam), १०. हसीन दिलरुबा(Haseen Dilruba). ही सर्व टॉप चित्रपटांची यादी आहे. (jai bhim is the top movie of 2021 check imdb full list of top movies)

आईएमडीबीच्या लिस्टमध्ये ‘जय भीम चित्रपट पहिल्या क्रमांकावर
अभिनेता सूर्याने ‘जय भीम’ (Jay Bheem) चित्रपट पहिल्या क्रमांकावर असल्याचा आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “एक अभिनेता आणि निर्माताच्या रूपामध्ये असे नेहमी होत नाही, की तुमच्यासमोर अशी काही घटना घडते ज्यामुळे तुमचा थरकाप उडवतो. जय भीम चित्रपट असाच एक अनुभव आहे. या चित्रपटाचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. भावना आणि नाट्य यांचा सुंदर मिलाफ असलेली ही कथा असहाय्यता आणि सामाजिक परिवर्तन यांवर भाष्य करते. सर्व वर्ग समीक्षक आणि प्रेक्षकांकडून वारंवार मिळत असलेले प्रेम आणि कौतुक पाहून खूप आनंद झाला. मी खूप खुश आहे, कारण जय भीम (Jay Bheem) हा २०२१ च्या प्रतिष्ठित आईएमडीबी टॉप रेटेड चित्रपटाचा एक भाग आहे. मी माझ्या हितचिंतकांचे आणि प्रेक्षकांच्या दिलेल्या प्रेमाबद्दल आणि मताबद्दल मनापासून आभार मानत आहे. जय भीम चित्रपटाला २४० हून अधिक देशात आणि प्रदेशांमध्ये घेऊन जाण्याबद्दल प्राईम व्हिडिओचे (Prime video) मनापासुन आभार मानतो.” तर दुसरीकडे रिलीझ झाल्यापासून सतत हा चित्रपट वादात देखील राहिला आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा