Pushpa: समंथा प्रभूच्या आयटम सॉन्गने तोडले रेकॉर्ड, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अंदाजाने रसिकांना भुरळ


अलिकडेच पुष्पा (Pushpa) चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला. सर्व प्रेक्षकांचे लक्ष चित्रपट रिलीझ कधी होणार यावर आहे. या चित्रपटातील धमाकेदार ट्रेलरनंतर, आता या चित्रपटातील ‘ओ ओ अंतवा ओ ओ अंतवा’ (Oo Antava Oo Oo Antava) आयटम सॉन्ग रिलीझ झाले आहे. या गाण्यामध्ये समंथा प्रभू (Samantha Prabhu) ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. या गाण्यातील समंथाला पाहून सर्व प्रेक्षक तिच्या सुंदरतेची आणि हॉटनेसची वाहवा करत आहेत. हे गाणं सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

‘पुष्पा’ या चित्रपटाचे आयटम सॉन्ग रिलीझ होण्याआधी, समंथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्ट शेअर करून तिने गाण्याच्या रिलीझबाबत माहिती दिली होती. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून, हे गाणे १० डिसेंबरला रिलीझ होईल, अशी घोषणा केली होती. हे गाणे रिलीझ होताच, इंटरनेटवर खूप गाजत आहे. गाण्याला युट्यूबवर खूप युजर्सने पाहिले आहे आणि भरभरून पसंतीही दर्शवली. दुसरीकडे, चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करून, व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद आणि व्ह्यूज मिळाल्याचे सांगितले आहे. (pushpa song oo antava samanthas hotness rocked the internet item song made a record on youtube samantha item song)

आयटम सॉन्गने युट्यूबवर तोडले रेकॉर्ड
समंथाच्या या गाण्याला युट्यूबवर ४ मिलियनहून अधिक युजर्सने पाहिले आहे. तसेच यावर ३ लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. निर्मात्यांनी शेअर केलेल्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “क्वीन समंथाने युट्यूबवर आग लावली आहे.” या पोस्टवर समंथाने आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. या गाण्याची प्रेक्षक खूप उत्सुकतेने वाट पाहत होते. त्याचप्रमाणे ट्रेलर देखील युट्यूबवर खूप गाजला.

विविध भाषेत रिलीझ होणार चित्रपट
‘पुष्पा’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात जंगलातील गोष्ट दाखवली गेली आहे. या चित्रपटात जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांचे हाल आणि दुःख दाखवले आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या व्यतिरिक्त, फहाद फासिल(Fahad fasil) हे देखील आहेत. हा चित्रपट तेलगू भाषेत बनवला आहे. परंतु हिंदी, तमिळ, मल्यालम आणि कन्नड भाषेतही हा चित्रपट रिलीझ होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार (Sukumar) यांनी केले आहे आणि मनीष शाह (Manish Shah) या चित्रपटाचे निर्माते आहेत.

हेही वाचा


Latest Post

error: Content is protected !!