Bigg Boss 15: राखी सावंत पोहोचली फिनालेमध्ये, करण अन् तेजस्वी यांच्यात उडाली वादाची ठिणगी


बिग बॉसच्या (Bigg Boss) लेटेस्ट भागात बिग बॉसने राजीव दत्ता आणि रितेश यांना राखी सावंत (Rakhi Sawant), रश्मी देसाई (Rashmi Desai), शमिता शेट्टी (Shamita Shetty), तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) यांच्या हेअरस्टाईल करण्यास सांगितले. अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) आणि निशांत भट्ट (Nishant Bhatt) प्रत्येकाच्या हेअरस्टाईलचे परीक्षण करतात. सगळ्यांची हेअरस्टाईल पाहून अभिजीत सगळ्यांना मार्क देतो.

अभिजीतने राखीला १० पैकी ९.५ रश्मीला ९, शमिता शेट्टीला १०, तेजस्वी प्रकाशला ९ आणि देवोलिनाला ८ गुण दिले. यामध्ये शमिता जिंकली. शमिताला जिंकल्याचा आनंद होतो. त्याचवेळी देवोलीनाला खूप राग येतो. ती अभिजीतवर खूप नाराज झाली होती. (bigg boss 15 rakhi sawant win ticket to finale tejasswi prakash and karan kundra miffed due to vishal)

राखीने पोहोचली फिनालेमध्ये
राखीने फिनाले टास्कचे तिकीट जिंकले आहे. यासोबतच एक ट्विस्ट देखील आला, जेव्हा बिग बॉसने सांगितले की, व्हीआयपी स्पर्धकांपेक्षा नॉन व्हीआयपींकडे जास्त पैसे आहेत. त्यामुळे व्हीआयपी स्पर्धक म्हणून आलेले सर्व आता नॉन-व्हीआयपी स्पर्धक झाले आहेत. तर राखी आता व्हीआयपी स्पर्धक झाली आहे.

देवोलीनाला आले रडू
देवोलिना अभिजीतवर ओरडते आणि म्हणते की, “तू दोन तोंडी आहेस. तू माझ्याकडून सर्व कामे करून घेतो. जेव्हा गरज असेल तेव्हा तू माझ्याकडे येतो आणि शमिताला जिंकून देतो.” यानंतर देवोलिना रडू लागते.

राखी बनली डायन
मागच्या सीझनप्रमाणे यंदाही राखी पुन्हा डायनच्या रुपात आली आहे. शमिता तिला विचारते, ती कुठून आली. तर राखी म्हणते, “मी इथे राहते.” शमिता म्हणाली, “तू कुठे राहतेस? ती म्हणते, “मी येथे २०० वर्षांपासून आहे.” शमिता म्हणते, “तेव्हा हे सर्व नव्हते.” तेव्हा राखी म्हणते की, “इथे मी पूर्वी राकेशसोबत राहायचे.” हे ऐकून शमिता हसू लागली.

तेजस्वी घाबरली
राखी डायन बनून न चुकता सर्वांचे मनोरंजन करते. मात्र तिथे उपस्थित तेजस्वी घाबरते. जेव्हा राखी तिच्या जवळ येते, तेव्हा ती बेडच्या मागे लपते. ती राखीपासून दूर पळते, पण राखी पुन्हा पुन्हा तिच्याकडे येते. तेजस्वीला घाबरवल्यानंतर राखी पुन्हा तिथून निघून जाते.

विशालबद्दल झाली चर्चा
उमर रियाझ, राजीव दत्ता, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश विशालबद्दल बोलतात. तेजस्वी म्हणते की, “शमिता नव्हे तर विशालची पहिली प्रायोरिटी मी आहे, हे मला आधीच माहीत होते.” तर करण म्हणतो की, “तू आम्हाला ही गोष्ट कधी सांगणार होतीस. तुला विशालबद्दल सगळं माहीत होतं, पण तू आम्हाला सांगितलं नाहीस.”

करण तेजस्वीला सांगतो की, “मी आता तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही.” करण म्हणतो की, “मला खूप काही सांगायचे आहे, पण मी सांगणार नाही.”

करणसोबतच्या या संभाषणानंतर तेजस्वी खूप नाराज झाली. ती पूलाजवळ एकटी बसते आणि नंतर रात्री उशिरा पूलमध्ये एकटी वेळ घालवते.

हेही वाचा –


Latest Post

error: Content is protected !!