काहीही करो; कशीलीही वागो मनोरंजनाची क्वीन तर फक्त आणि फक्त राखीच, आम्ही नाही तिचे कारनामेच सांगतायत हे


जेव्हापासून राखी सावंतची एन्ट्री बिग बॉसमध्ये झाली, तेव्हापासून या शोची मजा डबल झाली आहे. राखी या शोमध्ये आल्यापासून रोजच तिच्या नवनवीन विचित्र गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्यामुळे बिग बॉसच्या स्पर्धकांसोबतच प्रेक्षक आणि खुद्द सलमान देखील राखीचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही. राखीच्या अतरंगी गोष्टी प्रेक्षकांना पहायला खूपच मजा येत असते. बिग बॉसचा भाग सुरु झाला की, आज राखी काय नवीन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.

राखी या शोमध्ये आल्यापासून अनेकदा अभिनव शुक्लाबद्दल भरभरून बोलताना आपण पाहिले असेल, आता तर राखीवर अभिनवच्या प्रेमाचा रंग चढलेला बघायला मिळत आहे. बिग बॉसच्या एका भागात राखीने एक शॉर्ट ड्रेस घातला होता आणि संपूर्ण शरीरावर तिने लिप्सस्टिकने अभिनव, आय लव्ह यू अभिनव असे लिहिले. राखी अशा अवतारातच संपूर्ण घरात फिरत होती. तिला असे पाहून घरातील सर्वच लोकं आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत असतात. ती सर्वाना सांगताना दिसत होती की ‘हे माझे वेडे प्रेम आहे.’

राखी तिच्या अशा हरकतींमुळे सिद्ध करते की तीच खरी मनोरंजनाची राणी आहे. ती नेहमी असे काही ना काही करत असते, घरातल्या प्रत्येक भांडणात तिचा सहभाग असतो, पण तरीही ती आजपर्यंत एलिमनेशनसाठी नॉमिनेट झाली नाहीये. ती दरवेळेस अशा हरकती करूनही ती सुरक्षित राहते, राखीने हे पुन्हा सिद्ध केले आहे की, ती फक्त आण फक्त त्या घरात मनोरंजनासाठी आली आहे. हे काम करण्यात ती खूप पटाईत आहेच

या वळणावर येऊन राखी सर्वांना वेडी नाही तर क्युट वाटते. घरात सगळे नेहमी म्हणतात राखी सारखे कोणी नाही. विकास गुप्ताने सांगितले की, राखी इतकी पॉवर त्याने कधीच कोणात पाहिली नाही. तो अर्शी खानला अर्थपर्यंत म्हणाला की अर्शी इथे राखी सारखे बनायला आली आहे, मात्र ती तसे बनू शकत नाही कारण संपूर्ण जगात राखी एकमेव आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.