×

केक कापताना कंट्रोल नाही झालं, नववधू मौनीने सर्वांसमोर केलं नवऱ्याला जोरात किसsss

अभिनेत्री मौनी रॉय ही लग्नबंधनात अडकली आहे. मौनीने तिचा बॉयफ्रेंड सुरजसोबत लग्न केले आहे. मौनीने गोव्यामध्ये लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाबाबत अभिनेत्रीने खूप गुप्तता पाळली होती. परंतु तरी देखील तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांचे मेहंदी, हळदी, संगीत हे सगळे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. मौनीने दाक्षिणात्य आणि बंगाली पद्धतीने लग्न केले आहे. लग्नात तिने तिच्या पतीसोबत प्रत्येक क्षण एन्जॉय केला आहे.

लग्नानंतर तिची पार्टी देखील झाली आहे. त्यांच्या या पार्टीतील काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या पार्टीमध्ये देखील मौनी (mauni roy) खूपच सुंदर दिसत होती. तिने चंदेरी रंगाचा सुंदर असा लेहंगा घातला आहे. तसेच तिच्या पतीने ब्लेझर घातले आहे. दोघेही अत्यंत सुंदर दिसत आहेत. (mouni roy kissing to her husbund in party)

अशातच या नवविवाहित जोडप्याचा पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, ते दोघेही केक कापताना दिसत आहे. परंतु मधेच मौनी तिच्या पतीला किस करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

याआधी देखील त्यांच्या या पार्टीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मौनी तिच्या गर्ल गँगसोबत टेबलवर चढून डान्स करताना दिसत होती. तिचा हा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता.

मौनीने अनेक मालिकांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली आहे. खास म्हणजे ‘नागीण’ या मालिकेने तिला खूप ओळख मिळाली. तिला सर्वत्र नागीण या नावानेच ओळखले जाते. त्यामुळे तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. तिचे लग्न झाल्याचा तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. अनेकजण तिला तिच्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

 

Latest Post