×

‘या’ प्रसिद्ध गायकासोबत उर्फी जावेद करणार लग्न? प्री- वेडिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल

उर्फी जावेद आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत असते. आपले बोल्ड आणि घायाळ करणारे फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ज्यामुळे सगळीकडे ती चर्चेचा विषय बनते. मात्र या फोटोंमुळे कधीकधी तीला जोरदार ट्रोलींगचा सामनाही करावा लागतो. अनेकदा ती अशा काही पोस्ट करते ज्यामुळे सगळेच विचारात पडतात. आता तिच्या नवीन पोस्टमुळे असाच काहीसा विचार तिच्या चाहत्यांना पडला आहे. नेमका काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊ.

बिग बॉस ओटीटीमधून लोकप्रिय झालेली उर्फी जावेद (urfi javed)नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपले नवनवे फोटो ती यावर पोस्ट करत असते. मात्र आता उर्फीने सोशल मीडियावर एक नवा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे ती लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, उर्फीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती गायक कुंवरसोबत पोज देताना दिसत आहे. मात्र या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कारण या फोटोखाली तीने चक्क ‘प्री वेडिंग शूट’ असा कॅप्शन दिला आहे, ज्यामुळे ती लग्न करते की काय ? असाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र या कॅप्शनच्या पुढे तिने एक हसण्याचा इमोजी टाकला आहे, ज्यामुळे तिने हा फोटो गंमत म्हणून पोस्ट केल्याच दिसत आहे. उर्फी आणि कुंवरचा हा फोटो एका शूटमधला असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी ही तिने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता ज्यामध्ये ती थंडीमुळे गारठल्याचे दिसत होते. या व्हिडिओसोबत उर्फीने मायनस डिग्री तापमानामध्ये शूट करत असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्फीने, ”मायनस ८ डिग्री मध्ये यावेळी मला फक्त तू जाने ना गाणे आठवत आहे. जरी कुंवर गायक असला, तरी त्याची उंची ६.३ फूट आहे, त्यामुळे मला त्याची बरोबरी करायला पाटाची गरज भासली. जेव्हा जेव्हा मी काम करते तेव्हा मला या समस्येला सामोर जावे लागते कारण माझी उंची ५.१ इतकीच आहे,” अशी खंत व्यक्त केली आहे. या पोस्टवरुन ति लवकरच कुंवरसोबत नवीन गाण्यात झळकणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान उर्फी जावेदच्या ‘हल चल’ या पंजाबी गाण्याने जोरदार धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत हे गाणे १ तब्बल १ कोटी ५० लाख लोकांनी पाहिले आहे. यामध्ये उर्फीने एका पंजाबी मुलीची भूमिका साकारली आहे. हे गाणे कोरला मानने लिहीले आहे. सध्या हे गाणे प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

 

Latest Post