Friday, July 5, 2024

आईची परिस्थिती पाहूण ढसा ढसा रडली राखी सावंत, पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘प्रार्थना करा…’

बॉलिवूडमधील आणि टीव्ही अभिनेत्री राखी सावंत सतत आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे ओळखली जाते. नुकतंच राखी बिग बॉस मराठीच्या अंतिम सोहळ्यात बाहेर पडली आहे. तिने नुकतंच तिच्या आईबद्दल माहिती देत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. राखीची आई जया सावंत यांना दवाखान्यात भर्ती केलं असून त्यांची तब्येत गंभीर आहे. राखीने सांगितले की, तिच्या आईला ब्रेनट्युमर आणि कॅन्सर सारख्या भयंकर आजाराशी झुंज देत आहे. अभिनेत्रीने ढसढसा रडत व्हिडिओ शेअर केला आहे.

ड्रामक्वीन म्हणनू ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सतत असं काही करते ज्यामुळे ती सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. मात्र, यावेळेस अभिनेत्रीने स्वत:चं दु:ख शेअर केलं आहे. राखीची आई जया सावंत या गंभीर आजारांशी लढा देत आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात भर्ती केलं असून त्यांची तब्येत खूप गंभीर आहे. राखीने व्हिडिओ शेअर करत तिच्या अईच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा असं सांगितलं आहे. राखी पोस्ट शेअर करत म्हणाली की, “काल रात्री मी बिग बॉस मराठीतून बाहेर आले. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आईची तब्येत ठीक नाही. ती रुग्णालयात आहे…कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा…मम्मी कॅन्सरशी लढत आहे. तिला ब्रेन ट्युमर तसेच कॅन्सर असल्याचं नुकतंच समोर आलं आहे.”

राखीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आई हॉस्पिटलमध्ये आहे. त्याची प्रकृती चांगली नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” राखीच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिच्या आईसाठी प्रार्थना केली. महिमा चौधरी (Mahima Chaudhary), पवित्रा पुनिया (Pavitra Puniya), राहुल वैद्य (Rahul Vaidya), सोफिया हयात, सलमान शेख आणि डेलनाज इराणी या कलाकारांनी जया सावंत यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

 

View this post on Instagram

 

व्हिडीओमध्ये राखी खूप रडताना आणि आईसाठी प्रार्थना करण्याची विनंती करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये राकेश नावाचा एक व्यक्ती जया सावंत यांच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू झाल्याचे सांगताना दिसत आहे. त्याशिवाय डॉक्टर सांगत आहेत की, कर्करोग फुफ्फुसात पसरला आहे. ते म्हणतात की, त्यांनी काही चाचण्या केल्या आहेत, ज्यांचे रिपोर्ट शुक्रवारपर्यंत येतील, डॉक्टरांनी सांगितले की, कॅन्सर खूप वाढला आहे, त्यामुळे सध्या ऑपरेशन करता येणार नाही. त्यानंतर त्यांना किती रेडिएशनची गरज आहे हे कळेल. असं डॉक्टर सांगताना दिसत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
श्वास रोखून धरा! वादात सापडलेल्या ‘पठाण’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज, काय असेल सिनेमात खास?
‘ज्या इंडस्ट्रीने मला…’, छेल्लो शो पाहिल्यानंतर प्रियंका चोपडाची पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा