Tuesday, October 15, 2024
Home अन्य राखीच्या आनंदावर ‘ग्रहण’! जवळच्या व्यक्तीनेच चोरले पैसे आणि महागडी गाडी आक्रोश करतानाच व्हिडिओ व्हायरल

राखीच्या आनंदावर ‘ग्रहण’! जवळच्या व्यक्तीनेच चोरले पैसे आणि महागडी गाडी आक्रोश करतानाच व्हिडिओ व्हायरल

मनोरंजनविश्वातील ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत नेहमीच या ना त्या कारणामुळे लाइमलाइट मिळवण्याचा प्रयत्न करत असते. ती सतत लहान गोष्ट मोठी करून आणि मीडिया समोर हल्ला करूनच सांगायची असते. तिच्या या सवयीमुळे ती सतत मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर गाजत असते. नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या चिंतेत असते. आता पुन्हा एकदा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती चक्क रिक्षेने प्रवास करताना दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये राखीला फोटोग्राफर्सने तिची गाडी कुठे असल्याचे विचारताच तिने तिच्यासोबत घडलेली आपबिती सर्वाना सांगितली. यावेळी राखी म्हणते, “माझ्या आयुष्यात सुख नावाची गोष्ट मला कधी मिळणार आहे का? मलाच माहित नाही. कालच माझा ड्रायव्हर पप्पू यादव माझ्या महागड्या बीएमडब्ल्यू गाडीची चावी, पैसे, माझा सोन्याचा फोन आणि माझी मर्सिडीज गाडी घेऊन पळून गेला आहे. तो गरीब असल्याने मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानेच माझा विश्वासघात केला. मी हजारो रुपयांचे कपडे घालून माझ्यावर आता रिक्षामधून फिरण्याची वेळ आली आहे. पण मुंबईच्या रस्त्यांसाठी रिक्षाच योग्य आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

दरम्यान राखीने तिच्या या ड्रायव्हर पप्पू यादव विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. यावेळी ती म्हणाली की ती चांद्रयान ३ चा आनंद साजरा करत होती, मात्र पप्पू यादवने तिच्या आयुष्याला ग्रहण लावले आहे. राखीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिची फिरकी घेतली आहे. एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

अधिक वाचा- 
“वाट्टेल ते बोलण्याचा परवाना…” रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
नादखुळा! रजनीकांतच्या ‘हुकुम’ गाण्याचा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा