Thursday, September 28, 2023

नादखुळा! रजनीकांतच्या ‘हुकुम’ गाण्याचा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रजनीकांतचा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. रजनीकांतने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्याचे लाखो चाहते आहेत. त्याने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर खूप मोठा चाहता वर्ग कमावला आहे. सध्या रजनीकांतचा ‘जेलर’ नावाचा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चर्ची प्रेक्षकांमध्ये रंगली असल्याचे दिसत आहे.

जेलर‘ (jailor ) या सिनेमाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार हे करत आहेत. 17 जून 2022ला रजनीकांतच्या (Rajinikanth) या चित्रपटाचे पोस्टच जारी करण्यात आला होता. सिनेमाच्या पोस्टरमध्ये रक्ताने माखलेले चाकू दाखवण्यात आला आहे. आता नुकतेच सिनेमातील दुसरे गाण्याचा टीझर रिलीझ झाला आहे. रजनीकांतच्या चित्रपटातील गाण्याच्या या टीझरवर लोक भन्नाट कमेंट करत आहेत.

या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. टीझरमध्ये तो ऍक्शन करतानाही दिसत आहे. हातात बंदूक घेऊन रजनीकांतचा लूक पाहण्यासारखा आहे. रजनीकांतचा नेल्सन दिलीपकुमारसोबतचा ‘जेलर’ हा चित्रपट या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. या टीझरच्या माध्यमातून साउथ मेगास्टारने त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sun Pictures (@sunpictures)

या चित्रपटाचे हे दुसरे गाणे आले आहे. याचे संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. ‘जेलर’ हा नेल्सन दिलीपकुमार लिखित आणि दिग्दर्शित एक संपूर्ण ऍक्शन मनोरंजन करणारा चित्रपट आहे. या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना आणि विनायकन देखील दिसणार आहेत. मोहनलाल या चित्रपटात कॅमिओ करणार आहे. त्याचबरोबर शिव राजकुमारही या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. हे संपूर्ण गाणे 17 जुलै रोजी रिलीज होणार आहे. टीझरमध्ये रजनीकांत तुरुंगातून बाहेर येताना दिसत आहेत. (The teaser of the song ‘Hukum’ from Rajinikanth’s film ‘Jailor’ has been released)

अधिक वाचा- 
सेल्फ ‘डे’ आऊट! पहिल्यांदाच भारताबाहेर गेलेल्या ”या” अभिनेत्रीने खास पद्धतीने साजरा केला वाढदिवस
‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतोय बोल्ड व्हिडिओ

हे देखील वाचा