अपनी पोडे पोडे पोडे!! पॅपराजींना पाहून विचित्र पण ‘हटके’ डान्स करताना दिसली ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत


बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या त्यांच्या कामापेक्षा अधिक त्यांच्या विवादित वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे जास्त प्रकाशझोतात येतात. मनोरंजनसृष्टीतील सर्वात मोठी ड्रामा क्वीन हा किताब मिळवणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखी नेहमीच तिच्या बेताल वक्तव्यांमुळे मीडियामध्ये येण्याचा प्रयत्न करतच असते. सध्या तर राखीचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे. जेव्हा जेव्हा पॅपराजी राखीला घेरतात, तेव्हा राखी काहीतरी चाळे करून त्यांचे मनोरंजन करताना देखील दिसते.

आता पुन्हा एकदा राखी तिच्या नवीन व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. राखीला पुन्हा पॅपराजींनी घेरले असता, ती त्यांना पोझ देताना एका तामिळ गाण्यावर विचित्र नाचताना दिसली आणि लगेच निघून गेली. राखी या व्हिडिओमध्ये लाल टॉप आणि लाल शॉर्ट्समध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल भयानीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. राखीचा हा व्हिडिओ अगदी छोटा असूनही तुफान व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओला फॅन्सकडून भरभरून कमेंट्स आणि व्ह्यूज मिळत आहे. या व्हिडिओवर येणाऱ्या कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहे. या कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी नौटंकी की दुकान, ओवर एक्टिंग अशा शब्दांचा वापर केला आहे. राखी पॅपराजींना विचारताना देखील दिसली होती की, तुम्हाला माझा पत्ता नेहमी कसा सापडतो? माझा ड्रायव्हर तर देत नाही ना?

राखीने १९९७ ‘अग्निचक्र’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. राखीने अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका केल्या आहेत. प्रत्येक मुद्यांवर बेधडक वक्तव्य करणाऱ्या राखीने राजकारणात देखील नशीब आजमावले आहे. अनेक वर्षांपासून राखी स्क्रीनपासून लांब होती, मात्र मागच्याच महिन्यात तिचे ‘ड्रीम में एंट्री’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शिवाय राखीने ‘बिग बॉस’ या शोमध्ये देखील पुन्हा प्रवेश केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चिंकी’ आणि ‘मिंकी’ पुन्हा एकदा चर्चेत; सोशल मीडियावर व्हायरल होतोय जबरदस्त डान्स परफॉर्मन्स

-‘इश्क सुफीयाना’ म्हणत माधुरी दीक्षितने शेअर केला व्हिडिओ; तिच्या अदांनी चाहते पुन्हा झाले घायाळ

-रील्सवरून जेनेलियाची टिंगल करताना दिसला रितेश; युजर्स म्हणाले, ‘आज जेवण नाही मिळणार!!’


Leave A Reply

Your email address will not be published.