‘इश्क सुफीयाना’ म्हणत माधुरी दीक्षितने शेअर केला व्हिडिओ; तिच्या अदांनी चाहते पुन्हा झाले घायाळ


बॉलिवूडमध्ये ‘धक धक गर्ल’ या नावाने लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरी ही ५४ वर्षाची आहे. पण तिच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचे लाखो दीवाने आहेत. माधुरी ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर गेली आहे. पण या गोष्टीचा तिच्या चाहत्यांच्या यादीत काडीमात्र फरक पडला नाही. उलट दिवसेंदिवस ही यादी वाढतचं चालली आहे. तसेच तिच्या सौंदर्याचा निखार देखील वाढत्या वयासोबत वाढतच चालला आहे. अशातच चाहत्यांना घायाळ करणाऱ्या माधुरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Madhuri Dixit’s latest video viral on social media)

माधुरी दीक्षितने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माधुरीने अत्यंत सुंदर पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच हातात बांगड्या आणि कानात मोठे ईअर रिंग्ज घातले आहे. तसेच केसांची पोनी घातली आहे. यावर तिने हलकासा मेकअप केला आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला विद्या बालनच्या ‘द : डर्टी पिक्चर’ मधील इश्क सुफियाना हे गाणे वाजत आहे. या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने ‘इश्क सुफीयाना’ हे कॅप्शन दिले आहे. तिच्या या व्हिडिओवर तिचे चाहते खूप प्रेम दर्शवत आहेत.

सोशल मीडियावर माधुरीची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती तिच्या चाहत्यांना कधीही नाराज करत नाही.

माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘दिल’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘डान्स दीवाने ३’ या शोला जज करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर


Leave A Reply

Your email address will not be published.