रील्सवरून जेनेलियाची टिंगल करताना दिसला रितेश; युजर्स म्हणाले, ‘आज जेवण नाही मिळणार!!’


अनेक कलाकार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात आणि प्रसिद्धीत राहण्याचा हा मार्ग सर्वानाच खूप आवडतो. अनेक कलाकार त्यांचे फोटो व्हिडिओ पोस्ट करून प्रकाशझोतात येतात. मात्र या सर्वांसारखे असूनही सर्वांमध्ये वेगळे ठरणारे एक कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा. बॉलिवूडमधील सर्वात क्युट आणि लोकप्रिय कपल म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. हे दोघे मोठ्यापडद्यावर जितके लोकप्रिय आहे, तितकेच ते सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे.

सोशल मीडियावर हे दोघं नेहमी त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ बनून अपलोड करताना दिसतात. त्यांच्या या मजेशीर व्हिडिओंना नेटकऱ्यांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत असतो. या दोघांनी नुकताच त्यांचा एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये ते जेनेलियाचा सिनेमा ‘जाने तू या जाने ना’ मधील एक संवाद म्हणताना दिसत आहेत. अतिशय फनी असलेला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जेनेलियाचा या सिनेमातील एक संवाद दाखवला आहे. ज्यात ती म्हणते, “कॉलेज के ५ साल कहां निकल गए पता ही नहीं चला.” यावर रितेश म्हणतो, “रील्स पे बेटा रील्स पे.” त्यांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर धूम करत आहे. सोबतच याला लाखो लाइक्स आणि व्ह्यूज देखील आले असून, फॅन्सच्या भन्नाट कमेंट्सही येत आहे. एकाने लिहिले, “आज जेवायला नाही मिळणार.” तर दुसऱ्याने लिहिले, “सोबत नेहमीच परफेक्ट”.

रितेश आणि जेनेलिया यांचे असे छोटे आणि मजेशीर व्हिडिओ नेहमी मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये चर्चेत असतात. बॉलिवूडची सगळ्यात गोड जोडी म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा या जोडीचे नाव घेतले जाते. ३ फेब्रुवारी २०१२ ला त्यांनी लग्न केले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या लग्नाला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्यावेळी या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर


Leave A Reply

Your email address will not be published.