Tuesday, April 23, 2024

कडक नियमात रकुल आणि जॅकी गोव्यात घेणार सात फेरे, पाहुण्यांना फोन वापरण्याची देखील नाही परवानगी

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक रकुल प्रीत सिंह (Rakul Prit Singh) लवकरच जॅकी भगनानीसोबत लग्न करणार आहे. रकुल बर्‍याच दिवसांपासून जॅकीला डेट करत आहे आणि त्यांच्या नात्याला ते अधिकृत करणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात हे जोडपे गोव्याला सात फेऱ्या मारणार आहेत. रकुल आणि जॅकीचे डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. आता या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित अपडेट समोर आले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार रकुल आणि जॅकीच्या लग्नाचे बहुतांश विधी गोव्यात होणार आहेत. या जोडप्याला त्यांचे लग्न खाजगी ठेवायचे आहे. रकुल आणि जॅकी 22 फेब्रुवारीला गोव्यात लग्नगाठ बांधणार आहेत. रकुल आणि जॅकीच्या या आगामी लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. विवाह खाजगी असेल.

रकुल आणि जॅकी या लग्नाबाबत प्रायव्हसी ठेव्याची आहे. दोघांनाही त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूप गुप्त ठेवायला आवडते. अशा परिस्थितीत दोघांनी मिळून त्यांच्या लग्नासाठी कठोर नियम बनवले आहेत. रकुल आणि जॅकीच्या लग्नात पाहुण्यांना फोन वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. या बातमीने रकुलच्या चाहत्यांची नक्कीच निराशा झाली आहे. दोन दिवसांत या जोडप्याच्या लग्नाचे फंक्शन होऊ शकते, अशी बातमी आहे.

दोघेही त्यांच्या लग्नाच्या सजावट आणि थीमवर बारीक लक्ष ठेवून आहेत. लग्नाची तयारी सुरू करण्यापूर्वी रकुल आणि जॅकी नुकतेच थायलंडमध्ये सुट्टी घालवून परतले. रकुल आणि जॅकीने 2021 मध्ये एकमेकांसोबतचे नाते सार्वजनिक केले होते. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

फेब्रुवारी 2024 मध्ये रश्मीका आणि विजय देवरकोंडा करणार साखरपुडा, बातम्यांना आले उधाण
सलमान खानच्या सुरक्षेत भंग? दोन संशयितांनी फार्महाऊसमध्ये घुसण्याचा केला प्रयत्न

हे देखील वाचा