Thursday, April 18, 2024

फेब्रुवारी 2024 मध्ये रश्मीका आणि विजय देवरकोंडा करणार साखरपुडा, बातम्यांना आले उधाण

नॅशनल क्रश म्हटल्या जाणार्‍या रश्मिका मंदान्नासाठी करिअरच्या दृष्टीने गेले वर्ष खूप खास होते. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ या चित्रपटात तिने रणबीर कपूरची पत्नी गीतांजलीच्या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित माहिती समोर येत आहे.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत सेटल होण्याच्या तयारीत आहे. असेही बोलले जात आहे की रश्मिका आणि विजय फेब्रुवारीमध्ये एंगेजमेंट करू करणार आहे.

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र, या दोघांनीही कधीच आपले नाते जाहीरपणे स्वीकारलेले नाही. आता मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दोघांनाही आपलं नातं लग्नाच्या टप्प्यापर्यंत नेऊ इच्छित आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दोघेही त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा करू शकतात.

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी अद्याप एंगेजमेंट आणि लग्नाच्या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रश्मिका आणि विजय यांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’मध्ये एकत्र काम केले आहे. चाहत्यांना त्यांची ऑनस्क्रीन जोडी खूप आवडते.

रश्मिकाच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. यावेळी रश्मिका ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. 1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झालेल्या ‘Animal’ ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 550.47 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सलमान खानच्या सुरक्षेत भंग? दोन संशयितांनी फार्महाऊसमध्ये घुसण्याचा केला प्रयत्न
खरचं की काय? आलियानंतर कॅटरिना कैफही देणार गुड न्यूज; व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

हे देखील वाचा