Sunday, July 14, 2024

अंगात काळ्या रंगाचे साधे कपडे आणि पायात चप्पल न घालता पोहचला रामचरण पार्टीला

सध्या एसएस राजामौली दिग्दर्शित, जुनियर एनटीआर आणि रामचरण अभिनित ‘आरआरआर’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. या सिनेमाची चर्चा मागील अनेक काळापासून चालू होती हा सिनेमा आला आणि त्याने मोठा धमाका केला. नुकतीच या सिनेमाची शानदार सक्सेस पार्टी संपन्न झाली. यापार्टीला अनेक मोठमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडची पार्टी म्हटली की, चमक धमक डिझायनर महागडे कपडे डोळ्यासमोर येतात. मात्र आरआरआरच्या या पार्टीमध्ये जेव्हा अभिनेता रामचरणने एन्ट्री मारली तेव्हा सर्वच लोकं बघतच राहिले.

आरआरआर सिनेमा लवकरच संपूर्ण जगात कमाईचा १००० कोटींचा आकडा पार करणार आहे. याचाच आनंद साजरा करण्यासाठी मुंबईमध्ये एक जोरदार पार्टी झाली या पार्टीला सिनेमात मुख्य भूमिकेत आस्नार रामचरण पोहचला आणि सर्वांच्याच नजरा त्याच्यावर खिळल्या. त्याच्या लूकने आणि त्याच्या अंदाजने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

या पार्टीमध्ये रामचरणने अतिशय साधा असा काळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घालून आला होता. त्याच्या हातात भगव्या रंगाचे कापड होते तर पायात चप्पला देखील नव्हत्या. त्याचा हा लूक पाहून अनेकांनी त्याने असा लूक का केला असावा असा प्रश्न विचारला आहे. त्याच्या अशा अवताराचे कारण म्हणजे त्याने अय्यप्पा स्वामींचे दिवसांचे कठीण व्रत घेतले आहे.

या व्रतामध्ये व्यक्तीला दिवस शाकाहारी भोजन घ्यावे लागते, जमिनीवर झोपावे लागते, चप्पल न घालता राहावे लागते आदी अनेक सुखसोयींचा त्याग करून व्रताच्या शेवटच्या दिवशी केरळमधील शबरीमाला मंदिरात जाऊन अय्यप्पा स्वामींचे दर्शन घ्यावे लागते. त्याच्या या सध्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, त्याच्या या लूकचे सोशल मीडियावर भरपूर कौतुक होत आहे. मनोरंजनविश्वात अनेक कलाकार हे व्रत पाळताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी अजय देवगणने देखील हे व्रत पळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा