Thursday, July 18, 2024

‘राम सेतू’ चित्रपट वाचवू शकेल का अक्षय कुमारची डुबती नय्या, ओपनिंग दिवशी जमेल का एवढा गल्ला?

खिलाडी अक्षय कुमार पन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी नवीन चित्रपट राम ,सेतू घेऊन येत आहे. एका वर्षामध्ये सगळ्यात जास्त चित्रपट कोणाचे येत असतील तर तो अभिनेता अक्षयच ठरेल. त्याने दोन महिण्यापूर्वीच रक्षाबंधन चित्रपट केला होता आत पुन्हा एकदा दिवाळी सणाला तो नवीन चित्रपट राम सेतुसोबत पुन्हा एकदा झळकतोय.

अक्षय कुमार (Akshay Kumar) पुन्हा एकदा बॉक्सऑफिसवर नवीन चित्रपट ‘राम सेतू’ घेऊन येत आहे. तो खूप उत्साहाने या चित्रपटाच्या प्रमोशनला लगाला आहे. त्याच्यासाठी हा चित्रपट खूपच महत्वाचा ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये त्याचे जेवढे चित्रपट आले आहेत तेवढेही फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे त्याच्या आतापर्यतच्या करिअरमध्ये असे कधीच झाले नाही मात्र, असे पुन्हा असे होऊ नये यासाठी तो राम सेतू चित्रपटासाठी जिवतोड मेहनत करत आहे.

अक्षयची हा चौथा चित्रपट आहे जो चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होत आहे. काहि दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये अक्षयकुमार आर्कियोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटामध्ये सत्यदेव कांचराना, प्रवेश राणा, हनी यादव आणि रोफिक खान हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेट 150 कोटी रुपये आहे. जर या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी 15 ते 20 कोटी कमाई झाली तरच या चित्रपटाचा व्यवसाय बऱ्यापैकी चालेल.

‘राम सेतू’ चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा याने केले असून अरुणा भाटिया, लाइका प्रोडक्शन आणि विक्रम मल्होत्रा यांच्याद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट दिवाळी दिवशी म्हणजेट 24 ऑक्टोंबर दिवशी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अक्षय कुमारचे लागोपाठ ‘पृथ्वी राज चव्हान’, ‘रक्षाबंधन’, सारखे बीग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आदळले होते. सध्या बॉलिवूडमध्ये बॉयकॉट ट्रेंड सुरु झाल्यामुळे चित्रपट फार चालताना दिसत नाहीत आता अक्षय कुमारचा राम सेतू चित्रपट किती चालेल हे त्याच्यासाठी खूपच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाचता येईना अंगण वाकडं! शाहरुखच्या मुलीनं साडी नेसली खरी पण झाली फजिती, व्हिडिओ पाहाच
पतीला चिअरअप करण्यासठी धनश्रीने गाठले ऑस्ट्रेलिया, पोस्ट शेअर करत उर्वशाला मारला टोमणा

हे देखील वाचा