Thursday, July 18, 2024

पतीला चिअरअप करण्यासठी धनश्रीने गाठले ऑस्ट्रेलिया, पोस्ट शेअर करत उर्वशाला मारला टोमणा

दिवाळीच्या मोहोत्सवात सध्या विश्वचषक सुरु झाला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा टी20 विश्वकपमध्ये सामिल होण्यासाठी थेट ऑस्ट्रेलिया गाठली आहे. धनश्री एक डांन्स आणि युट्यबर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने नुकतंच एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना कळविले आहे की, तिने ऑस्टेसियाला आपल्या पती युजवेंद्रला चिअरअप करण्यासाठी जात आहे. पोस्ट शेअर करत असताना तिने असे भन्नाट कॅप्शन दिले आहे ज्यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे.

डान्सर धनश्री वर्मा (Dhanashri Varma) हिने आपल्या सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाला जात असताना एक फोटो पोस्ट केला आहे ज्यासोबत तिने उर्वशीला निशाना साधून टोमणे मारले आहे. धनश्रीने कॅप्शमध्ये लिहिले होते की, “मेरा दिल मुझे सचमुच ऑस्ट्रेलिया ले आया। मुझे अपने आदमी के लिए वहां जाना ही था” धनश्रीच्या या पोस्टवर युजवेंद्र चहल (Yuzvendra) याने कमेंट करत दोन हार्टवाले एमोजी पाठवले. त्यासोबतच काही चाहत्यांनी कमेंट करत लिहिले की, “तु उर्वशीची मजाक उडवत आहेस का?”, दुसऱ्याने लिहिले की, “कॅप्शन आधीपण कुठे तरी वाचले आहे.”

यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) हा देखिल भारतीय क्रिकेट टीम सोबत टी20 वर्ल्ड कप 2022साठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. त्यांची एक्स गर्लफ्रेंड उर्वशी रौतेला (Uravashi Rautela) देखिल त्याचा मागे मागे थेच ऑस्ट्रेलिया गाठली होती. तेव्हा तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन चाहत्याना कळवले होते. त्यासोबतच तिने फोटो शेअर करत असताना कॅप्शमध्ये लिहिले होते की, अपने “अपने (ब्लैक हार्ट इमोजी) को फॉलो करते हुए…. यह मुझे ऑस्ट्रेलिया ले आया है।” अशा कॅप्शनमुळे तिला रिषभ पंतच्या नावाने खूपच ट्रोल केले होते. आता क्रिकेटर युजवेंद्र याच्या पत्नीनेही उर्वशीसारखे हैशटॅगचा उपयोग केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

धनश्रीने असे कॅप्शन देऊन थेट उर्वशीला आरसा दाखवला आहे. चाहत्यांनीही तिच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे. धनश्री नेहमी आपल्या सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंदन करत असते. तिचा करवा चौथचा व्हिडिओदेखिल तुफाल व्हायरल झाला होता. युजवेंद्र सामना असल्यामुळे परदेशात होता त्यामुळे धनश्रीने व्हिडिओ कॉल करुन करवा चौतचा उपवास तोडला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आशिष विद्यार्थी यांची महिलेने उडवली खिल्ली, म्हणाली, तुम्ही कोण..?
शालिन भनोट आणि टीना दत्ताचे पॅचप! कन्फेशन रुममध्ये अभिनेत्याने केला खुलासा…

हे देखील वाचा