बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान हिला तुम्ही अनेकदा स्टायलिश लूकमध्ये पाहिलं असेल. पण अलीकडेच मनीष मल्होत्रा याच्या दिवाळी पार्टीत सुहानाने काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. दिवाळी पार्टीमध्ये पहिल्यांदाच सुहानाने साडी नेसली होती. गोल्ड शिमर साडीमध्ये सुहाना सुंदर दिसत असली तरी तिला पाहून असे वाटले की, साडी नेसणे तिच्यासाठी एक माेठे टास्क हाेते.
सध्या सोशल मीडियावर सुहाना (suhana khan) हिचे पारंपरिक पोशाखात अनेक व्हिडिओ आणि फोटो प्रचंड व्हायरल हाेत आहेत. व्हायरल हाेत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सुहानासाठी साडी नेसणे किती माेठे टास्क हाेते.
View this post on Instagram
जेव्हा सुहाना पार्टीत आली तेव्हा तिला पहिल्यांदाच साडीत पाहणं सगळ्यांसाठी नवीन होतं. सर्वांच्या नजरा सुहाना आणि तिच्या लूकवर खिळल्या होत्या. सुहानाने स्ट्रिप ब्लाउज आणि बनसह सिंपल साडी नेसली होती. विशेष म्हणजे तिने साडीच्या पदराला टाचुन घेतले हाेते, जेणेकरून तिला साडी हाताळताना जास्त त्रास होऊ नये.
View this post on Instagram
सोशल मीडियावर यूजर्स सुहानाच्या या लूकचे कौतुक करत आहेत. एका युजर्सने कमेंट करत म्हणटले की, “क्षणभरासाठी त्यांना वाटले की, ती दीपिका पदुकोण आहे.” यूजर्सच्या मते ती इंडस्ट्रीची दीपिका आहे. युजर्सनी सुहानाच्या साडीतील लूकचे कौतुक केले. सुहानाने पॅपराझींना चांगल्या पोज दिल्यात आणि नंतर ‘धन्यवाद’ म्हणत निघून गेली.
मनीष मल्हाेत्रा याच्या दिवाळी पार्टीत सुहाना व्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध कलाकार पाेहचले हाेते. या पार्टी दरम्यान अनन्या पांडे आणि आदित्तय राॅय कपूर एकत्र स्पाॅट, ज्याने ते दाेघे एकमेकांना डेटिंग करत असल्याचे युजर्स अंदाज लावत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
पतीला चिअरअप करण्यासठी धनश्रीने गाठले ऑस्ट्रेलिया, पोस्ट शेअर करत उर्वशाला मारला टोमणा
दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा थेटट्रोलर्सलाच प्रश्न; ‘अक्षय कुमार पॅन्टशर्ट घालून क्रिष्णाची भूमिका करु शकतो मग चित्रगुप्त…’