Wednesday, June 26, 2024

‘जलेगी भी तेरी बाप की’, हनुमानाच्या तोंडून हा डायलॉग ऐकून थक्क झालेत सुनील लहरी; म्हणाले, ‘अत्यंत लज्जास्पद…’

रामायणावर आधारित ‘आदिपुरुष‘ हा चित्रपट 16 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. खरे तर, या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच वादात सापडला हाेता. अशात आता ‘आदिपुरुष’ रिलीज झाल्यानंतर त्याच्या संवादांबद्दल प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर युजर्सच्या निशाण्यावर आहेत. चित्रपटातील काही संवाद अगदी छपरी आहेत, जे दैवी पात्रांच्या तोंडून ऐकणे चाहत्यांना आवडले नाही. रामायण फेम सुनील लहरी यांनीही त्यातील खराब संवादांचा निषेध केला आहे. काय म्हणाले सुनील लहरी? चला, जाणून घेऊया…

1990 च्या दशकात रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले. त्याचे पात्र अजूनही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. रामायण मालिका पाहण्याआधी लोक टीव्हीच्या खोलीत शूज आणि चप्पल काढून जात असत. इतकेच नव्हे तर, ते अगरबत्ती लावून नमस्कार ही करत असत. ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरीही त्यावेळी चांगलेच प्रसिद्ध झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Lahri (@sunil_lahri)

अशात ‘आदिपुरुष’च्या डायलॉग्सवर सुनील लहरीही भडकले आहेत. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी चित्रपटातील संवादांचा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘हे खूपच लज्जास्पद आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Lahri (@sunil_lahri)

ही पोस्ट शेअर करत सुनील लहरी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “आदिपुरुष हा चित्रपट रामायणला लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे, असे म्हटले जाते. जर ते खरे असेल, तर अशा भाषेचा वापर करणे अत्यंत लज्जास्पद आहे.” असे सुनील यांनी आपले मत व्यक्त करत सांगितले.(rama nand sagar ramayana laxman aka sunil lahri reacts on adipurush said hanuman raavan and others cast of adipurush dialogues it is very shameful)

अधिक वाचा-
झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा टिझर रिलीज, स्टारकिड्सच्या धमाल शैलीने जिंकली चाहत्यांची मने
क्रेन क्रॅश अपघातात कशीबशी वाचली होती काजल अग्रवाल; तुमच्याही अंगावर काटा आणेल तो थरारक किस्सा

हे देखील वाचा