Thursday, June 13, 2024

‘आदिपुरुष’मधील डायलॉगवरून उडाला गोंधळ, युजर्सनी दिल्या खोचक प्रतिक्रिया

रामायणासारख्या पौराणिक महाकाव्यावर आधारित ‘आदिपुरुष‘ या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली आहे. 16 जून रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. ट्विटरवर युजर्स चित्रपटातील संवाद आणि व्हीएफएक्सची खिल्ली उडवत आहेत. अशात साऊथ स्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’चे काही डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हे आधुनिक रामायण मानले जाते. हा चित्रपट अॅनिमेशन स्वरूपात बनवण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याची जबरदस्त क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, यादरम्यान चित्रपटातील संवाद आणि काही दृश्यांवर युजर्सनी आक्षेप घेतला आहे. काही लोकांना चित्रपटातील प्रभासचा अभिनय आवडला नाही, तर काहींना VFX मध्ये त्रुटी आढळल्या. अशात लेखक मनोज मुंताशिर यांनी लिहिलेले संवाद अतिशय घाणेरड्या पद्धतीचे आहे असे युजर्सचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर युजर्सनी आदिपुरुषाला ‘छपरी’ आणि ‘टपोरी’ असे संबोधले आहे. आदिपुरुषचे काही संवाद ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. अशात एका युजरने ट्विट करत लिहिले की, ‘जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे…’असे डायलॉग…देव अशी भाषा बोलयचे का?

त्याचवेळी, चित्रपटात रावण आणि हनुमान यांच्याकडून विचित्र संवाद बाेलवण्यात आला आहे, जसे-कपड़ा तेरे बाप का, आग तेरे बाप की, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की…’

‘तेरी बुआ का बाग है क्या जो हवा खाने आ गया…’ लाेकांना अशाप्रकरची टपाेरी भाषा अजिबातच आवडलेली नाही. अशात ट्विटरवर युजर्सच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. युजर्स चित्रपटाच्या संवादांपासून ते व्हिज्युअलपर्यंत सोशल मीडियावर टिका करत आहे.

‘आदिपुरुष’मध्ये प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत, क्रिती सेनॉन माता सीतेच्या भूमिकेत आणि सैफ रावणाच्या भूमिकेत आहे. याशिवाय सनी सिंग, देवदत्त नागे आणि सोनल चौहान यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे, तर संवाद मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहेत.(There was confusion on the dialogue of ‘Adipurush’, users gave reactions like ‘this’…)

हे देखील वाचा